ETV Bharat / state

बळीराजासोबत एक दिवस: नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याचे दुष्काळाशी दोन हात; स्वतःच खोदली ३५ फूट विहीर..! - nanded farmer

जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चेनापूर गावच्या शेतकरी दाम्पत्य दुष्काळाला पुरुन उरले आहे. किशन मार्कंड असे या शेतकऱ्याचे नाव असून सालगडी ते बागायतदार शेतकरी असा त्यांचा प्रवास आहे.

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याचे दुष्काळाशी दोन हात
author img

By

Published : Jun 22, 2019, 10:13 PM IST

Updated : Jun 23, 2019, 9:51 AM IST

नांदेड - जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून दुष्काळ शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे स्वतःचे जीवन संपविले आहे. परंतु, अर्धापूर तालुक्यातील चेनापूर गावच्या शेतकरी दाम्पत्य दुष्काळाला पुरुन उरले आहे. किशन मार्कंड असे या शेतकऱ्याचे नाव असून सालगडी ते बागायतदार शेतकरी असा त्यांचा प्रवास आहे. त्यांनी कुटुंबीयांच्या मदतीने ३५ फूट विहीर खोदून दुष्काळाशी दोन हात केले.

'वाळूचे कण रगडीता तेलही गळे' ही प्रचंड परिश्रमाची म्हण येथे तंतोतंत खरी ठरल्याचा जणू प्रत्यय येतो. आयुष्यात संघर्ष असल्याशिवाय 'राम' नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी अनेक वर्षे सालगडी म्हणून काम केले आहे. त्यांना ४ मूले आणि ५ मुली आहेत. मेहनत करून त्यांनी पाचही मुलींचे लग्न केले. तसेच ३ मुलांचेही लग्न झाले असून त्यांचा त्यांचा संसार सुखात सुरू आहे.

संसाराचा गाडा चालवत त्यांनी परिश्रमाच्या बळावर दीड एकर जमीन घेतली आहे. त्या जमिनीत पहिल्या वर्षी सोयाबीनची लागवड केली. पण केवळ ६० किलोच उत्पन्न निघाले. त्यामुळे ते प्रचंड निराश झाले. पण जिद्द सोडली नाही. त्यांनी शेतात बोअर घेतला. मात्र, त्याला पाणी कमी असल्यामुळे ते चिंतेत होते.

पाणी टंचाईवर उपाय म्हणून या दांम्पत्याने स्वतःच विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयामुळे परीसरातील लोक त्यांना वेड्यात काढत होते. लोकांकडे दुर्लक्ष करत दोघांनी विहीर खोदण्याचे काम चालूच ठेवले. १५ फूट पर्यंत स्वतःच विहीर खोदली. पण नंतर क्रेनची मदत त्यांना लागणार होती. पण त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी यावर उपाय शोधत लाकडाचे क्रेन घरीच तयार केले. त्याच्या साहय्याने विहिरीतला कच्चा माल काढला. याकामी त्यांना कधी-कधी एका मुलाची व मुलीचीही मदत झाली. पण या दांम्पत्याने न थकता शेवटपर्यंत काम सुरू ठेवले. विहिरीला पाणीही चांगले लागले. त्यांनी स्वत:हा पस्तीस फुटापर्यंत काम केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याचे दुष्काळाशी दोन हात

सध्या त्यांच्या शेतात केळी व हळदीचे पीक आहे. यातून त्यांनी चांगले उत्पन्नही काढले आहे. पेरणीसाठी सध्या ते पावसाची प्रतीक्षा करत असून केळीची लागवड करणार आहेत. दोघे पती-पत्नी आणि एक मुलगा यांचे शेतातच वास्तव्य आहे. इतर मुले मात्र मोल-मजुरी करून आपली उपजिवीका करतात. मार्कंड दाम्पत्य आजही दुष्काळाशी दोन हात करून समाधानाचे जीवन जगत आहेत.

सध्या शेतीला चांगले दिवस नाहीत. निसर्गाचा लहरीपणा आणि शेतकऱ्यांच्या मालाला न मिळणारा योग्यभावाने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. पण हार मानून चालणार नाही. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल न उचलता एक दिवस यश नक्कीच मिळेल. 'येईल दिवस तुझाही माणसा जिगर सोडू नको'. असाच संदेश त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

किशन मार्कंड यांनी शेतकऱ्यांना दिला संदेश

आज शेतीला दिवस चांगले नाहीत. याची मलाही जाणीव आहे. परंतु, अडचणींना कंटाळून शेतकरी कुटुंबाची काळजी घ्यायची सोडून आत्महत्येसारखे चुकीचे पाऊल उचलतो. मात्र, यातून फक्त कुटुंब उघड्यावर येते. संघर्षाशिवाय जीवन नाही. इतर कामे व मेहनत करून जीवन जगावे पण आत्महत्या करू नका, अशा संदेश शेतकरी किशन मार्कंड यांनी शेतकऱ्यांना दिला.

Intro:नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याचा दुष्काळाशी संघर्ष; स्वतःच खोदली पस्तीस फूट विहीर....!
नांदेड: जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुजलेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जामुळे स्वतःचे जीवन संपविले. पण नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चेनापूर गावचा असे एक शेतकरी दाम्पत्य आहे. किशन मार्कंड असे शेतकऱ्याचे नाव असून सालगडी ते बागायतदार शेतकरी असा प्रवास करत स्वतःच पस्तीस फूट विहीर खोदून दुष्काळाशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला आहे.Body:नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याचा दुष्काळाशी संघर्ष; स्वतःच खोदली पस्तीस फूट विहीर....!
नांदेड: जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुजलेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जामुळे स्वतःचे जीवन संपविले. पण नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चेनापूर गावचा असे एक शेतकरी दाम्पत्य आहे. किशन मार्कंड असे शेतकऱ्याचे नाव असून सालगडी ते बागायतदार शेतकरी असा प्रवास करत स्वतःच पस्तीस फूट विहीर खोदून दुष्काळाशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला आहे.

'वाळूचे कण रगडीता तेलही गळे' ही प्रचंड परिश्रमाची म्हण येथे तंतोतंत खरी ठरल्याचा जणू प्रत्यय येतो. आयुष्यात संघर्ष असल्याशिवाय 'राम' नाही. असे त्यांचे म्हणणे असून सत्तर वर्ष वय असलेल्या शेतकरी दाम्पत्य किशन मार्कंड व पार्वतीबाई मार्कंड हे करून दाखविले आहे.
अनेक वर्षे अनेक भागात सालगडी म्हणून काम केले आहे. त्यांना चार मूल आणि पाच मुली आहेत. मेहनत करून त्यांनी पाच मुलींचे लग्न केले. तसेच तीन मुलाचेही लग्न झाले असून त्यांचा त्यांचा संसार सुखात सुरू आहे. एक छोटा मुलगा त्यांच्या सोबत राहतो.
एवढे सर्व कार्य पाडूनही त्यांनी सालगडी म्हणून काम करत परिश्रमाच्या बळावर दीड एकर जमीन घेतली आहे. त्या जमिनीत पहिल्या वर्षी सोयाबीनची लागवड केली. पण केवळ साठ किलोच उत्पन्न निघाले. त्यामुळे ते प्रचंड निराश झालो. पण जिद्द सोडली नाही. बोअर पाडले पण पाणी कमी पडत होते.
मग या दाम्पत्याने स्वतःच विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी परीसरातील लोक त्यांना वेड्यात काढत होते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत विहीर खोडण्याचे काम चालूच ठेवले. पंधरा फूट पर्यंत स्वतःच विहीर खोदली. पण नंतर क्रेनची मदत त्यांना लागणार होती. पण त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी यावर उपाय शोधत लाकडाचे क्रेन तयार केले. त्याच्या साहय्याने विहिरीतला कच्चा माल काढला. याकामी त्यांना कधी-कधी एका मुलाची व मुलीचीही मदत झाली. पण या दाम्पत्याने मात्र शेवटपर्यंत काम सुरू ठेवले. विहिरीला पाणीही चांगले लागले. पस्तीस फुटापर्यंत काम केले आहे.
सध्या त्यांच्या शेतात केळी व हळदीचे पीक घेत असून चांगले उत्पन्न काढले आहे. पेरणीसाठी सध्या ते पावसाची प्रतिक्षा करत असून केळीची लागवड करणार आहेत. दोघे पती-पत्नी आणि एक मुलगा यांचे शेतातच वास्तव्य आहे. इतर मुले मात्र मोल-मजुरी करून आपली उपजिवीका करतात. मार्कंड दाम्पत्य आजही दुष्काळाशी दोन हात करून समाधानाचे जीवन जगत आहेत.

सध्या शेतीला दिवस चांगले नाहीत. निसर्गाचा लहरीपणा आणि शेतकऱ्यांच्या मालाला न मिळणारा योग्यभाव शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. पण हार मानून चालणार नाही. आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल न उचलता एक दिवस यश नक्कीच मिळेल. 'येईल दिवस तुझाही माणसा जिगर सोडू नको'. असाच संदेश मिळत आहे.

---------------------------
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता लढल पाहीजे-किशन मार्कंड

आज शेतीला दिवस चांगले नाहीत. याची मलाही जाणीव आहे. पण तरुण वयात लग्न करायचे आणि मग मूल होतात. त्यांचे काळजी घ्यायची सोडून त्याचवेळी आपण आत्महत्येसारखे चुकीचे पाऊल उचलतो. आणि आपले कुटुंब उघड्यावर येते. संघर्षाशिवाय जीवन नाही. इतर कामे व मेहनत करून जीवन जगावे पण आत्महत्या करू नाही.अशी प्रतिक्रिया शेतकरी किशन मार्कंड यांनी दिली आहे.Conclusion:
Last Updated : Jun 23, 2019, 9:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.