नांदेड - शिवसेना आमदारांचा गट घेवून भाजपसोबत ( MP Hemant Patil ) सत्ता स्थापन केलेल्या एकनाथ शिंदे ( nanded district shivsena leaders will join Shinde group ) यांच्या गटात नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा समावेश आहे. त्यात आता सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यात खासदार हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या दोन विद्यमान जिल्हाप्रमुखांसह जवळपास ११ तालुकाप्रमुख आणि विविध विभागाचे पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होणार आहेत.
हेही वाचा - Nanded Youth Murder: वाद सोडवायला गेलेल्या युवकाची हत्या
महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगली वागणूक मिळत नाही, तसेच विकासकामे होत नाहीत, असा आरोप करत करत एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदारांचा एक गट घेवून बाहेर पडले. त्यात नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार बालाजी कल्याणकर यांचादेखील समावेश होता. कल्याणकर हे खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाशिवाय शिवसेना सोडूच शकत नाहीत, असा दावा काही शिवसैनिकांनी केला होता. दरम्यान, शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कल्याणकरांच्या बंडाविरोधात निदर्शने केली. त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही केले. त्यातच खासदार पाटील हे देखील शिंदे गटात सहभागी झाल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. त्यानंतर शिवसैनिकांचा बंडखोरीला होणार विरोध काही प्रमाणात मावळल्याचे पहायला मिळाले.
दोन जिल्हाप्रमुखांसह पदाधिकारी घेणार प्रवेश - सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत नांदेडचे जिल्हा प्रमुख उमेश मुंढे, आनंदराव बोंढारकर यांच्यासह शेतकरी आघाडीचे प्रल्हाद इंगोले, जि.प. च्या माजी उपाध्यक्षांचे चिरंजीव आकाश रेड्डी, अर्धापूर तालुकाप्रमुख संतोष कपाटे, सचिन येवले, मुदखेडचे संजय कुऱ्हे, सचिन माने, भोकरचे अमोल पवार, माधव बिन्नेवाड, तुलजेश यादव, जयवंतराव कदम, उद्धव शिंदे आदी पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे समजते.
हेही वाचा - VIDEO : नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात जीप गेली वाहून; चालकाला वाचविण्यात पोलिसांना यश