ETV Bharat / state

नांदेडमध्ये स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा - physical abused case nanded

भोकर शहरात १ मार्च २०१९ ला एका नराधमाने स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप आणि १४ हजार ५०० रुपये दंड सुनावला आहे.

life sentence up to death to accused in physical abused case
नांदेड जिल्हा व सत्र न्यायालय
author img

By

Published : Nov 29, 2019, 12:32 PM IST

नांदेड - स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम पित्यास भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पोक्सो कायद्यान्वये दाखल झालेल्या या गुन्ह्यात भोकर पोलिसांनी अवघ्या ४८ दिवसांत पित्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते, तर न्यायालयानेही ९ महिन्यात या खटल्याचा निकाल दिला.

नांदेडमध्ये स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

भोकर शहरात १ मार्च २०१९ ला एका नराधमाने स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास चाकून भोसकून मारण्याची धमकी देखील दिली होती. पीडित मुलीने सर्व प्रकार शाळेतील शिक्षिका आणि मुख्याध्यापिका यांना सांगितला. शिक्षकांनी मुलीला धीर देत ही घटना आजोबांना सांग, असे सांगितले. त्यानंतर मुलीने ही घटना आजोबांना सांगितली. त्यावरून कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी पीडित मुलीचा जवाब नोंदवून घेतला. पोलीस उपनिरीक्षक पूनम सूर्यवंशी यांनी आरोपीविरोधात भोकर पोलिसांत बलात्कार, पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. तसेच जिल्हा सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप आणि १४ हजार ५०० रुपये दंड सुनावला आहे.

Intro:नांदेड : पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्यास जन्मठेप.
- ४८ दिवसात दोषारोपपत्र तर ९ महिन्यात न्यायालयाचा निकाल.

नांदेड :भोकर स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा नराधम पित्यास भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पोक्सो (बाल लैंगिक अत्याचार) कायद्यान्वये
दाखल झालेल्या या गुन्ह्यात भोकर पोलिसांनी अवघ्या ४८ दिवसांत पित्याविरुद्ध न्यायालयात
दोषारोपपत्र दाखल केले तर न्यायालयानेही अवघ्या नऊ महिन्यात या खटल्याचा निकाल देऊन नराधम पित्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक महिती अशी की, भोकर तालुक्यातील एक कुटुंब भोकर शहरात राहत होते.
१ मार्च २०१९ रोजी या कुटुंबातील नराधम पित्याने स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून माणुकीच्या नात्याला काळिमा फासला.Body:
शिवाय हा प्रकार कोणाला सांगितला तर चाकूने भोसकून मारून टाकतो,अशी धमकीही त्याने निरागस बालिकेला दिली.पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार शाळेतील शिक्षिका आणि मुख्याध्यापिका यांना सांगितला शिक्षकांनी मुलीला धीर देत ही घटना तू तुझ्या आजोबांना सांग असे सांगितलं. त्यांनतर मुलीने ही घटनाआपल्या आजोबांना सांगितली. त्यावरून घरच्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी पीडित मुलीचा जवाब नोंदवून घेतला आणि पोलीस उपनिरीक्षक पूनम सूर्यवंशी यांनी आरोपी पित्याविरुद्ध भोकर पोलीसात बलात्कार, पोक्सो (बाल लैंगिक अत्याचार) कायद्यान्वये गुन्हा नोंदविला.Conclusion:
या पुराव्याच्या आधारे जिल्हा सत्र न्यायाधीश एम.एस.शेख यांनी आरोपी पित्याला मरेपर्यंत जन्मठेप आणि अन्य कलमामध्ये एक वर्ष, १४ हजार ५०० रुपये दंड सूनावला.या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे वकील रमेश राजूरकर यांनी बाजू मांडली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.