ETV Bharat / state

नांदेडची विमानसेवा सोमवारपासून सुरू; प्रवास दर जैसे थे - nanded airport start

गेल्या पन्नास दिवसांपासून भारतात अनेक विमानतळावरील रेल्वे विमानसेवा बंद करण्यात आली होती. आता मात्र, नांदेड येथील विमानसेवा सुरुळीत होणार असून, सुरक्षित अंतर ठेवून प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.

nanded-airlines
नांदेडची विमानसेवा सोमवारपासून सुरू; प्रवास दर जैसे थे
author img

By

Published : May 23, 2020, 5:28 PM IST

नांदेड - कोरोनामुळे संपूर्ण देशभरात थांबलेली विमानसेवा २५ मेपासून सुरू होत आहे. याच धर्तीवर नांदेड येथील विमानसेवा देखील सोमवारपासून सुरू होत असल्याची माहिती विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिली. नांदेडला सध्यातरी टृजेट सेवा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. नांदेडहून दिल्ली तसेच चंदीगडलाही विमानसेवा पूर्वीप्रमाणे सुरू होणार आहे.

गेल्या पन्नास दिवसांपासून भारतात अनेक विमानतळावरील रेल्वे विमानसेवा बंद करण्यात आली होती. आता मात्र, विमानसेवा सुरुळीत होणार असून, सुरक्षित अंतर ठेवून प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. नांदेड-मुंबई, मुंबई-नांदेड तसेच नांदेड-हैदराबाद, हैदराबाद-नांदेड अशी सेवा सुरू होत आहे. विमानतळावर विमान सेवा सुरू व्हावे, यासाठी अनेक प्रवासी वाट पाहत होते. विमान निघण्यापूर्वी किमान दोन तास प्रवाशांनी विमानतळावर हजर राहण्याची सूचना प्रवाशांना देण्यात आली आहे.

विमानसेवा बऱ्याच दिवसानंतर सुरू होत असली तरी विमानाचे तिकीट दर जास्त वाढलेले नाहीत. २५ मे रोजीचे नांदेड-मुंबई विमानसेवेचे तिकीट तीन हजार रुपये आहे. तर नांदेड-हैदराबाद विमानसेवेचे तिकीट नेहमीप्रमाणे अठराशे रुपये आहे. विमानसेवा बऱ्याच दिवसांनी सुरू होत असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी होईल असे भाकीत व्यक्त केले जात आहे. तरिही प्रवाशांची क्षमता लक्षात घेता ही सेवा पूर्वीप्रमाणेच दर्जेदार राहील असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.