ETV Bharat / state

शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थीनीशी अश्लील चाळे; गुन्हा दाखल - naigaon police on minor student abusing

बाबूराव मोरे या नराधम शिक्षकाने नाव असून त्याने अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे व मोबाईल वरून अश्लील चॅटिंग करून छेडछाड केली आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षक बाबूराव मोरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

naigaon police have registered a case against teacher for abusing minor student
शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थीनीशी अश्लील चाळे; गुन्हा दाखल
author img

By

Published : Mar 3, 2021, 9:45 AM IST

नांदेड - मुदखेडमधील एका शाळेतील बलात्काराची घटना ताजी असताना नांदेडात आणखी एका चिमुकलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नायगाव तालुक्यातील एका शाळेत हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे शिक्षकानेच विद्यार्थींनी अश्लील वर्तन केले आहे. या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

बाबूराव मोरे असे नराधम शिक्षकाने नाव असून त्याने अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे व मोबाईलवरून अश्लील चॅटिंग करून छेडछाड केली आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षक बाबूराव मोरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी शिक्षक हा पीडित मुलीला तुला परीक्षेत चांगले मार्क देतो म्हणून अश्लील चाळे व चॅटिंग करत होता. सदर बाब पीडित मुलीने पालकांना सांगितली. ही बाब समजल्यानंतर पालकांनी गावकऱ्यांसमवेत शाळेत जाऊन सदर शिक्षकास याविषयी जाब विचारला. तेव्हा शिक्षकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा जमलेल्या लोकांनी शिक्षकाला चोप दिला. त्यानंतर त्यांनी त्या शिक्षकाला पोलिसांच्या हवाली केले. कुंटूर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक करून विनयभंग, पोस्को आणि ऑट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अल्पवयीन मुलींच्या अत्याचारात वाढ-
मुदखेड अत्याचाराच्या घटनेला काही तास देखील उलटले नाहीत. त्यातच नांदेड जिल्ह्यात आणखी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना पुढे आली आहे. जिल्ह्यात मुलींवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. या पूर्वी देखील असे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे अशा घटना थांबवण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.