ETV Bharat / state

शुल्लक कारणावरून तरुणाची ब्लेडने वार करुन हत्या; आरोपी फरार - nanded

एका २० वर्षीय तरुणाने गोपाळ सुरेश जाधव (१८) याच्यावर ऑपरेशन करण्यासाठी वापरात येणाऱया धारदार ब्लेडने वार केले.

नांदेड पोलीस ठाणे
author img

By

Published : May 16, 2019, 8:24 PM IST

नांदेड - जुना कौठा परिसरातील नरोबा मंदिरासमोर एकाने तरुणावर ब्लेडने वार करुन ठार केले. ही घटना बुधवारी रात्री ८ वाजण्याचा सुमारास घडली.

नांदेड पोलीस ठाणे

बुधवारी रात्री किरकोळ कारणांवरुन दोन तरुणांमध्ये वाद निर्माण झाला. यावेळी एका २० वर्षीय तरुणाने गोपाळ सुरेश जाधव (१८) याच्यावर ऑपरेशन करण्यासाठी वापरात येणाऱया धारदार ब्लेडने वार केले. यात रक्तबंबाळ झालेल्या गोपाळला गंभीर अवस्थेत जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. पुढील तपासणीसाठी मृतदेह विष्णुपुरी येथील रुग्णालयात हलवण्यात आला. या घटनेनंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे सहकाऱयांसह घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी पोलिसांचा अतिकरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही.

Intro:नांदेड - शुल्लक कारणावरून तरुणावर ब्लेडने वार करून केले ठार.

नांदेड : जुना कौठा परिसरातील नरोबा मंदिरासमोर
एका तरुणावर ब्लेडने वार करुन त्याला ठार केल्याची घटना बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. सदर घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.Body:जुना कौठा येथील नरोबा मंदिरासमोर दोन तरुणांमध्ये बुधवारी रात्री किरकोळ कारणावरुन वाद निर्माण झाला. यावेळी एका २० वर्षीय तरुणाने गोपाळ सुरेश जाधव (१८) याच्यावर ऑपरेशन करण्यासाठी वापरात येणा-या धारदार ब्लेडने वार केले. यात रक्तबंबाळ झालेल्या गोपाळला गंभीर अवस्थेत नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक धनंजय पाटील
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नसल्याची माहिती पोलिस निरिक्षक कच्छवे यांनी दिली.Conclusion:
रात्री उशीरा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. या
घटनेमुळे कौठा भागात काही काळ तणावाचे
वातावरण होते. खबरदारीचा उपाय म्हणून या
भागात अतिरीक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात
आला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.