नांदेड : सरकारने 2 हजार रुपयाची नोट बंद करुन नागरिकांना चांगलाच झटका दिला आहे. त्यामुळे नागरिकांना 30 सप्टेंबरपूर्वी 2 हजार रुपयाची नोट बँकेत जमा करावी लागणार आहे. मात्र 2 हजार रुपयाच्या नोट बंदीवरुन संजय राऊतांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशातील यंत्रणा या सरकारच्या गुलाम म्हणून काम करत असल्याचा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. 2 हजार रुपयाची नोट बंद पाकिस्तानच्या सरकारने केली का, असा सवालही त्यांनी नांदेड येथे बोलताना केला.
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटबंदी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र काळा पैसा बाहेर निघाला नाही. सगळ्यात जास्त काळा पैसा हा भाजपच्या नेत्यांकडे आणि त्यांच्या मित्रांकडे आहे - संजय राऊत, खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे गट
देशाच्या अर्थव्यवस्थेचा खेळ खंडोबा केला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचा खेळ खंडोबा केल्याचा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटबंदी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र काळा पैसा बाहेर निघाला नाही. सगळ्यात जास्त काळा पैसा हा भाजपच्या नेत्यांकडे आणि त्यांच्या मित्रांकडे असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. देशाच्या अर्थव्यवस्थेशी इतक्या निर्घृणपणे कोणीच खेळले नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
भाजपच्या मित्रांनी नोटा बदलून घेतल्या असतील : देशात सगळ्यात जास्त काळा पैसा हा भाजपच्या मित्रांकडे असल्याचा हल्लाबोल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर केला. रिझर्व्ह बँकेने 2 हजार रुपयाच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय येण्याअगोदरच भाजपच्या मित्रांनी आपल्या नोटा बदलून घेतल्या असतील असा घणाघातही संजय राऊत यांनी भाजपवर केला.
हेही वाचा -
- Nana Patole News: मंत्रीमंडळ विस्तारात मंत्रीपदासाठी आता बोली लागणार काय? - नाना पटोले
- KCR On BRS Model In Country : विकासाचे बीआरएस मॉडेल भारतभर नेणार; बीआरएसने सुरू केली 288 मतदार संघात लढण्याची तयारी - केसीआर
- Maharashtra Ministry Expansion : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्ली दरबारी, मंत्रिमंडळाच्या विस्ताराला हिरवा कंदील ?