नांदेड - जिल्ह्यात आणखी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 11 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने द्विशतक ओलांडले असून संख्या 203 वर पोहोचली आहे.
राज्यात कोरोना संसर्ग जोरात वाढत असताना नांदेड जिल्हा तब्बल एक महिना कोरोनामुक्त होता. मात्र, त्यानंतर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि बघता बघता नांदेडने कोरोनाबाधित रुग्णांचा 200 चा आकडा सहज पार केला. जिल्ह्यात दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली आहे तसतशी कोरोना रुग्णांचा आकडाही वाढत चालला आहे. यामुळे, जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली असताना रस्त्यावरची गर्दी मात्र सैराट दिसून येत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत आज संध्याकाळी ५ पर्यंतची माहिती
• आत्तापर्यंत एकूण संशयित - 4580
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 4337
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 2445
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 95
• पैकी रुग्णालयात क्वारंटाईनमध्ये - 126
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 4211
• आज घेतलेले नमुने - 79
• एकुण नमुने तपासणी- 4658
• एकुण पॉझिटिव्ह रुग्ण- 203
• पैकी निगेटिव्ह - 4092
• नमुने तपासणी अहवाल बाकी - 98
• नाकारण्यात आलेले नमुने - 81
• अनिर्णित अहवाल – 177
• कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 137
• कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 11
• जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 1लाख 44हजार 13 इतके आहेत. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.