ETV Bharat / state

कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष - अशोक चव्हाण - महाराष्ट्र बंद

केंद्र सरकारने लोकाभिमुख निर्णय घेण्याची गरज आहे. मात्र त्याऐवजी एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाकडून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भरधाव वाहनाखाली चिरडले जाते. या घटनेतील पीडित कुटुंबांना भेटण्यासाठी लखीमपूर खीरीला जाणारे खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी सारख्या विरोधी पक्षातील नेत्यांना बळाचा वापर करून रोखले जाते, त्यांना अटक केली जाते. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात ११ (सोमवारी) ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद आहे, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

अशोक चव्हाण
अशोक चव्हाण
author img

By

Published : Oct 10, 2021, 4:37 PM IST

Updated : Oct 10, 2021, 4:54 PM IST

नांदेड - केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. मागील अनेक महिन्यांपासून देशाच्या कानाकोपऱ्यात शेतकरी आंदोलने होत आहे. परंतु केंद्र सरकार शेतकऱ्यांची बाजू समजून घ्यायला तयार नाही. केंद्र सरकारने लोकाभिमुख निर्णय घेण्याची गरज आहे. मात्र त्याऐवजी एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाकडून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भरधाव वाहनाखाली चिरडले जाते. या घटनेतील पीडित कुटुंबांना भेटण्यासाठी लखीमपूर खीरीला जाणारे खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी सारख्या विरोधी पक्षातील नेत्यांना बळाचा वापर करून रोखले जाते, त्यांना अटक केली जाते. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात ११ (सोमवारी) ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद आहे, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री
बंदला सहकार्य करण्याचे आवाहन

हा संपूर्ण प्रकार शेतकऱ्यांचा आणि विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. ही दडपशाही लोक सहन करणार नाहीत. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीने ११ ऑक्टोबर रोजी 'महाराष्ट्र बंद' पुकारला आहे. नागरिकांनी सुद्धा शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून या आंदोलनाला सहकार्य करावे.

'अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे'

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, ही अपेक्षा रास्त आहे. कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हानिहाय नुकसानाचा आढावा घेतला. नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी या बैठकीत सहभागी झालो होतो. या नैसर्गिक संकटामुळे नांदेड जिल्ह्यातील परिस्थिती बिकट झाली आहे. पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना तातडीने ८० टक्के नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी मी कालच्या बैठकीत केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत उद्या (सोमवारी) या विषयावर मुंबईत चर्चा होईल. पीक विमा आणि शेतकऱ्यांना एसडीआरएफ, एनडीआरएफमधून मदत देण्याबाबत येत्या आठवड्यात निर्णय होणे अपेक्षित आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले.

हेही वाचा - Lakhimpur Case : केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांचा राजीनामा घ्या - नवाब मलिक

Last Updated : Oct 10, 2021, 4:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.