ETV Bharat / state

'केंद्र सरकारचे 'हम करे सो कायदा' हे धोरण देशात चालणार नाही' - Ashok Chavan criticises central bjp government

केंद्रातील सरकार घटनेप्रमाणे चालत आहे की नाही, हे तपासून पाहिले पाहिजे. ससंदेत केलेल्या कायद्याला प्रचंड विरोध होत आहे. त्यामुळे केंद्रातील सरकार राज्यघटनेप्रमाणे चालत नसून 'हम करे सो कायदा' अशा पद्धतीने चालत असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
author img

By

Published : Feb 9, 2020, 4:58 AM IST

नांदेड - राज्यातील सरकार जरी तीन पक्षांचे असले, तरी ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसारच चालत आहे. मात्र, केंद्रातील सरकार घटनेप्रमाणे चालत आहे की नाही, हे तपासून पाहिले पाहिजे. ससंदेत केलेल्या कायद्याला प्रचंड विरोध होत आहे. त्यामुळे सध्या केंद्रातील सरकार घटनेप्रमाणे चालत नसून 'हम करे सो कायदा' अशा पद्धतीने चालत आहे. हे कदापि सहन केले जाणार नाही, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. लहान (ता.अर्धापूर) येथील तपोवन बुध्द भूमीतील १७ व्या आखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

आखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या उदघाटन प्रसंगी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण....

हेही वाचा... शरद पवारांच्या हत्येचा कट, पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल

भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नातून व दुरदृष्टीतून संविधान निर्माण झाले आहे. संविधानामुळेच देश व राज्य टिकून आहे. राज्यातील नागरीकांना व तरूणांना संविधान समजावे, यासाठी प्रस्ताविकेचे वाचन राज्यात सुरू केले आहे, असे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले. राज्यातील सरकार तीन पक्षांचे असले, तरी ते घटनेप्रमाणे काम करणारे आहे, असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. धम्म परिसरातील वातावरण दिशादर्शक आहे. या धम्म परिषदेच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जागृती व्हावी. तपोवन व परिसरातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येईल. लोकांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जावू देणार नाही, अशी ग्वाही देखील अशोक चव्हाण यांनी यावेळी दिली.

हेही वाचा... 'तुम्ही मोदींना माराल दंडे... तर आम्ही तुम्हाला फेकून मारू अंडे'

तपोवन बुध्दभूमित १७ व्या आखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला पुज्य भदंत डाॅ राहूलबोधी महास्थविर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहाने सुरूवात झाली. यावेळी तपोवन स्मरणिकेचे विमोचन पुज्य भदंत सत्यानंद महाथेरो यांच्या हास्ते करण्यात आले. धम्मपीठावर पुज्य भदंत सुबोधी, भदंत तनहंकर, भदंत जीवन भिक्खु बुध्दपूत्र यांच्यासह श्रावणेर संघ उपस्थित होता. धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष संजय देशमुख लहानकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, संयोजक संजय लोणे, तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, राजेश लोणे, अनुसयाबाई लोणे, प्रजापती लोणे यांनी स्वागत केले.

हेही वाचा... कर्जमाफीच्या मुद्यावरुन बच्चू कडूंचा बँकांवर गंभीर आरोप

Intro:केंद्रातील सरकारचे 'हम करे सो कायदा' कदापीही सहन करणार नाही- अशोक चव्हाण

Body:केंद्रातील सरकारचे 'हम करे सो कायदा' कदापीही सहन करणार नाही- अशोक चव्हाण

नांदेड: राज्यातील सरकार तीन पक्षाच जरी असलं तरी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसारच चालणार आहे. पण केंद्रातील सरकार घटनेप्रमाणे चालत आहे की नाही तपासून पाहिलं पाहिजे. ससंदेत केलेल्या कायद्याला प्रचंड विरोध होत आहे. सध्या केंद्रातील सरकार घटनेला धरून चालत नसून 'हम करे सो कायदा' अशा पद्धतीने चालत आहे. हे आम्ही कदापिही सहन करणार नाही असे आव्हान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. ते लहान (ता.अर्धापूर) येथील तपोवन बुध्द भूमीतील १७ व्या आखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.

अशोक चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नातून व दुरदृष्टीतून संविधान निर्माण झाले आहे. संविधानामुळेच देश व राज्य टिकून आहे. राज्यातील नागरीकांना व तरूणांना संविधान समजावे यासाठी प्रस्ताविकेचे वाचन सुरू केले आहे असे सांगितले. राज्यातील सरकार तीन पक्षाचे असले तरी घटनेप्रमाणे काम करणारे आहे. असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. धम्म परिसरातील वातावरण दिशा दर्शक आहे. या धम्म परिषदेच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जागृती व्हावी. तपोवन व परिसरातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येईल. लोकांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जावू देणार नाही.अशी ग्वाही बांधकाम तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यावेळी दिली.
यावेळी धम्म देसना देतांना पुज्य भदंत सत्यानंद यांनी दानाचे महत्त्व सांगताना म्हणाले की, अनाथ पिंडास यांनी दानाचा आदर्श आपल्या समोर ठेवला आहे. दान दिल्याने धन वाढत असते. दान ही निरंतर चालनारी  प्रक्रिया असते. उपसकांनी दान पारमितीचे पालन करावे असे आवाहन पुज्य भदंत सत्यानंद यांनी केले.
तपोवन बुध्दभूमित  १७ व्या आखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला पुज्य भदंत डाॅ राहूलबोधी महास्थविर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात सुरूवात झाली. यावेळी तपोवन स्मरणिकेचे विमोचन पुज्य भदंत सत्यानंद महाथेरो यांच्या हास्ते करण्यात आले. धम्मपीठावर पुज्य भदंत सुबोधी, भदंत तनहंकर, भदंत जीवन भिक्खु बुध्दपूत्र यांच्यासह श्रावणेर संघ उपस्थित होता. धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष संजय देशमुख लहानकर, काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, संयोजक संजय लोणे, तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, राजेश लोणे, अनुसयाबाई लोणे, प्रजापती लोणे यांनी स्वागत केले. यावेळी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर, किशोर भवरे, केशवराव  इंगोले, ईश्वर इंगोले, आनंद सावते, नागोराव इंगोले,  डाॅ विशाल लंगडे, पप्पु पाटील कोंढेकर, नासेर खान पठाण, गाजी काजी, सभापती कांतबाई सावंत राजु शेटे,  एल.बी रणखांब, उपसरपंच सतिश देशमुख, माजी सभापती आनंदराव कपाटे, आनंद क्षिरसागर, सावंत, प्रवीण देशमुख,पंडित लंगडे, व्यंकटी राऊत, ईश्वर इंगोले, भास्कर वैद्य, विजय देवडे, निळकंठ मदने, रंगनाथ इंगोले, उमेश सरोदे आमोल डोंगरे, भास्कर वैद्य आदी उपस्थित होते.

संयोजकाच्या वतीने संजय लोणे, अनुसया लोणे, राजेश लोणे यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे संयोजक संजय लोणे यांनी प्रास्ताविक केले. तर सुत्रसंचलन श्यामराव लोणे यांनी केले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.