नांदेड - ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांसह आता एआयएमआयएम देखील रिंगणात उतरली आहे. एमआयएमचे मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला यांनी विभागातील सर्व जिल्हाध्यक्षांना पत्र लिहून कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
शहरी भागापूरता पक्ष अशी ओळख पुसणार का?
एआयएमआयएम अर्थात ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन या पक्षाची ओळख केवळ शहरी भागात मर्यादित आहे. महाराष्ट्रात एमआयएमचे मुस्लिम बहुल भागात नगरसेवक आणि आमदार निवडून आले आहेत. हा पक्ष ग्रामपंचायत निवडणुकीत उतरणार आहे. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागातून चांगली मते मिळाल्याचा दावा एमआयएमकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा - संघराज्यांचा 'तो' विचार मारला तर रशियाप्रमाणे भारतातही राज्ये फुटतील - संजय राऊत