ETV Bharat / state

पेट्रोल-डिझेलचे भाव वाढता वाढे अन् दुधाचे भाव मात्र 'जैसे थे', उत्पादक शेतकेऱ्यांचे पाय आणखी खोलात - नांदेड दूध उत्पादक शेतकरी

गेल्या काही महिन्यात पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे त्याचा परिणाम दूध व्यवसायावर झाला आहे. उलट दुधाचे भाव वाढतील, अशी अपेक्षा होती. पण उलट जनावरांची वैरण व खल्ली (पेंड) महागली आहे.

Milk farmers in crisis
Milk farmers in crisis
author img

By

Published : Mar 6, 2021, 5:25 PM IST

नांदेड - गेल्या काही महिन्यात पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे त्याचा परिणाम दूध व्यवसायावर झाला आहे. उलट दुधाचे भाव वाढतील, अशी अपेक्षा होती. पण उलट जनावरांची वैरण व खल्ली (पेंड) महागली आहे. वैरण 5 ते 10 रुपयाला मिळणारी पेंडी चक्क 10 ते 20 रुपयांपर्यत वाढली आहे. तर पेंढ पूर्वी 1800 रुपये क्विंटल मिळायची मात्र आत्ता 2800 रुपयापर्यंत भाव झाला आहे. महागाई प्रचंड वाढली असताना दुधाला भाव नाही. गायीच्या दुधाचा भाव केवळ 29 रुपये तर म्हशीच्या दुधाचा भाव चाळीस रुपये मिळत आहे.

दूध व्यवसाय न परवडणारा..!

शेतीला जोडधंदा असणारा दुग्धव्यवसाय आता शेतकऱ्यांना परवडेनासा झाला आहे. दुधाला सध्या सरासरी ३० रुपये लिटर इतका अत्यल्प भाव मिळत आहे. तर गुरांना लागणारा चारा आणि इतर खाद्य यांचे दर भडकलेले आहेत. त्यामुळे दुग्धव्यवसाय आता न परवडणारा धंदा झाला आहे. लॉकडाऊनमुळे दुधाचा व्यवसाय मोडकळीस आला आहे.

दूध उत्पादक संकटात
कोरोनामुळे अगोदरच शेतकरी संकटात -कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरीही अडचणीत आला आहे. दुधाचे दर प्रती लिटर तब्बल 10 ते 12 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे पाण्याच्या भावात दुध विकले जात आहे. दूध उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे

हे ही वाचा - छापेमारीवर तापसी...'नॉट सो सस्ती एनीमोर', कंगनाचे धडाकेबाज प्रत्युत्तर.

जोडधंदा केवळ नावालाच अन संकटात -

शेतीला जोडधंदा म्हणून बळीराजा शेतकरी हा दुग्ध व्यवसायाकडे वळला. मात्र, आता हाच दुग्ध व्यवसाय अडचणीत आला असून संपूर्ण देशभरात कोरोना विषाणुने थैमान घातल्याने देशात तब्बल 80 दिवस लॉकडाऊन होता. याचा सर्वाधिक फटका दूध उत्पादक शेतकर्‍यांना बसला.

हे ही वाचा - मनसुख हिरेन प्रकरणात एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वझेंच्या भूमिकेचा वाढता गुंता

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा परीणाम -

पेट्रोल आणि डिझेल वाढत्या दराचा मोठा परिणाम झाला आहे. उत्पादन आणि वाहतुकीसाठी लागणारा खर्च वाढल्यामुळे जनावरांना लागणाऱ्या खुराकाच्या किमती वाढल्या आहेत. शेतकऱ्यांना एक लिटर दूध उत्पादनासाठी तब्बल 25 ते 30 रुपयांचा खर्च येत आहे. मात्र हेच दूध सध्या 29 रुपये लिटर ने विकले जात असल्याने शेतकऱ्यांना लिटरमागे तब्बल दहा रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे जनावरांचा चारा व पेंडचा खर्च महागला आहे. याचा देखील मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. साधारणपणे एका जनावराला अडीचशे रुपयाच्या जवळपास खर्च येतो. तर केवळे दोनशे रुपयांचे दूध उत्पादन होते. यामुळे दूध व्यवसाय संपूर्णत: मोडकळीस आला असून सरकारने आम्हाला मदत द्यावी, अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.