नांदेड - भाजप नेते आशिष शेलार गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ठाण मांडून आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजातील विविध संघटनेच्या नेत्यांशी व विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. नांदेड येथील एका बैठकीदरम्यान मराठा समाजातील अनेक संघटनांच्या प्रतिनिधीचा भाजपासह सर्वच राजकीय पक्षावर रोष दिसून आला.
'नांदेड येथे मराठा संघटनेच्या प्रतिनिधि सोबत बैठक'
नांदेड येथील शासकीय विश्रामगृहामध्ये शेलार यांनी मराठा समाजातील संघटनेच्या प्रातिनिधी सोबत बैठक घेतली. या बैठकीत मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, छावा, अखिल भारतीय छावा, जिजाऊ ब्रिगेडसह अनेक मराठा संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी संघटनेतील अनेक नेत्यांनी आपली भूमिका मांडली.
'मराठा आरक्षणाचे राजकीय भांडवल'
आरक्षणाची भूमिका मांडताना अनेकांचा सर्वच राजकीय नेत्यांवरील विश्वास उडाला असल्याचे दिसून आले. मराठा आरक्षणाच्या बाबतीत केवळ टोलवाटोलवीचे राजकारण चालत असून, या प्रश्नाचे केवळ राजकीय भांडवल करत असल्याची टीका केली. तसेच, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपाच्या सर्वच मराठा आमदारांनी दिल्लीला धडक देऊन केंद्रातून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा. तरच भाजपा किती खरी आहे हे दिसून येईल. यासाठी भाजपा नेत्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी मराठा संघटनेच्या प्रतिनिधीनी केले.
'ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण ही भाजपची भूमिका'
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भाजपची भूमिका आहे. मराठा समाजाच्या तीव्र भावना मी समजू शकतो. तसेच, नांदेडमध्ये मराठा समाजामध्ये जास्तच रोष असल्याचे दिसून आल्याचेही शेलार यावेळी म्हणाले. येणाऱ्या काळात मराठा आरक्षणासाठी भाजपा सर्व ताकदीनिशी समाजासोबत असल्याचे मत यावेळी त्यांनी यावेळी व्यक्त केले.
भाजपा नेते आशिष शेलार यांची आरक्षणाबाबत नांदेडमध्ये बैठक, मराठा संघटनांतून नाराजीचा सूर - मराठा समाज
भाजप नेते आशिष शेलार गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ठाण मांडून आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजातील विविध संघटनेच्या नेत्यांशी व विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.