नांदेड - अर्धापूर शहरातील बसवेश्वर चौकातील नवजीवन मेडिकल व शैलेश कृषी सेवा केंद्र या दुकानांना शनिवारी रात्री आग लागली. या आगीत मेडिकलमधील सर्व प्रकारची औषधी व लाकडी फर्निचर जळून खाक झाले आहे. तर कृषी सेवा केंद्रातील वेगवेगळ्या प्रकारची खते जळाली. या आगीत अंदाजे ४० लाखाचे नुकसान झाल्याचा दावा दोन्ही दुकान मालकांनी केला आहे. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
अर्धापूर शहरातील बसवेश्वर चौकात नवजीवन मेडिकल व शैलेष कृषी सेवा केंद्र ही दुकाने आहेत. शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास दुकानात आग लागली. ती शॉर्टसर्किटमुळे लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवजीवन मेडिकल स्टोअर्स व औषधी दुकानातील सर्व औषधी व फर्निचर जळून खाक झाले असून यामध्ये १५ लाख ९ हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे. औषधी दुकानाच्या बाजूला शैलेश कृषी सेवा केंद्राचे गोदाम असून यामध्ये खताच्या बॅगा जळाल्या व आग विझवताना त्या भिजल्या. या आगीमुळे त्यांचे २५ लाखांचे नुकसान झाल्याचा दावा दुकान मालकांनी केला आहे. शंकर कवठेकर व शैलेश शांतीलाल सोमाणी या दोघांनी अर्धापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन घटनेची नोंद करण्यात आली आहे.
मेडिकलमध्ये सॅनिटायझर व कृषी केंद्राच्या गोदामात ज्वलनशील सामान होते. पण वेळीच आग विझवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. आग लागलेल्या दुकानाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अर्धापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे यांनी घटनास्थळी भेट दिली.
अर्धापुरात मेडिकल स्टोअर्ससह कृषीसेवा केंद्र आगीत भस्मसात, जीवितहानी टळली - अर्धापूर
बसवेश्वर चौकात नवजीवन मेडिकल व शैलेष कृषी सेवा केंद्र ही दुकाने आहेत. शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास दुकानात आग लागली. या आगीत अंदाजे ४० लाखाचे नुकसान झाल्याचा दावा दोन्ही दुकान मालकांनी केला आहे.