नांदेड - राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनुसार आता नांदेड वाघाळा महापालिकेचे महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक 22 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात येणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांना लॉकडाऊनमुळे राज्य शासनाने मुदतवाढ दिली होती. आता राज्य शासनाने याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यासंदर्भात पत्र महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले आहे.
महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीबरोबरच शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदाचीही निवडणूक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी याबाबतचा अहवाल औरंगाबादच्या विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना पाठवला होता.