ETV Bharat / state

"मराठी भाषा संवर्धनासाठी बोली अभ्यासाची आवश्यकता"

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा, वाड्मय व संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने दि.०१ ते १५ जानेवारी दरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. या पंधरवड्याचे उद्घाटन प्रा.भगवंत क्षीरसागर यांच्या हस्ते झाले.

marathi-bhasha-savrdhan-program
मराठी भाषा संवर्ध
author img

By

Published : Jan 2, 2020, 7:30 AM IST

नांदेड - ‘दैनंदिन व्यवहारात आपण भाषा ही संज्ञा वापरत असलो तरी भाषेला स्वतंत्र अस्तित्व नसते. भाषेचे अस्तित्व बोलीमधून व्यक्त होत असते. बोली या स्थल, कालसापेक्ष असतात. बोलींच्या अभ्यासातूनच भाषेचा विकास होत असतो. त्यामुळे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी बोलींची जपवणूक गरजेची आहे’ असे प्रतिपादन जेष्ठ कवी भगवंत क्षीरसागर यांनी केले.

हेही वाचा- 'आता ‘मातोश्री’ वरुन आदेश येत नाही, तर दिल्लीतील मातोश्रींचे आदेश ऐकावे लागतात'

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने दि.०१ ते १५ जानेवारी दरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. पंधरवड्याचे उद्घाटन प्रा.भगवंत क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शैलजा वाडीकर होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाच्या मानव्यविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भगवान जाधव उपस्थित होते. डॉ.पृथ्वीराज तौर, डॉ. पी विठ्ठल, डॉ. वैजनाथ अनमुलवाड, डॉ.रमेश ढगे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

‘मराठी भाषेपुढील आव्हाणे आणि संवर्धनाचे प्रयत्न’ या विषयावर बोलताना कवी भगवंत क्षीरसागर यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी भाषा समृद्धीसाठी उभ्या केलेल्या संस्थांचा व भाषा धोरणाचा उल्लेख केला. प्रसारमाध्यमे, शिक्षणाचे माध्यम, परकीय भाषांचे आक्रमण, अशा विविध मुद्द्यांची क्षीरसागर यांनी दीर्घ चर्चा केली.

डॉ.पृथ्वीराज तौर यांनी भाषांतरीत केलेल्या ‘जपानहून आणलेल्या छोट्यांच्या मोठ्या गोष्टी’ या कथासंग्रहाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन यावेळी भगवंत क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ.भगवान जाधव यांनी मराठी भाषेच्या डोळस वापराकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. डॉ.शैलजा वाडीकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ.पी.विठ्ठल यांनी केले. डॉ.पृथ्वीराज तौर यांनी प्रास्ताविक तर डॉ.योगिनी सातारकर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंधरवड्यात विविध कार्यक्रम

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात कविसंमेलन, भाषा विषयक व्याख्याने, विद्यार्थ्यांच्या स्पर्धा, विकीपिडीया संदर्भातील कार्यशाळा, महाराष्ट्र गॅझेटीयर या विषयावर चर्चासत्र, माहितीपट, परदेशी विद्यार्थ्यांसाठी मराठी, गिरीश कार्नाड यांच्यावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाषा, वाङ्मय संकुलाच्या संचालक डॉ.शैलजा वाडीकर यांनी दिली.

Intro:मराठी भाषा संवर्धनासाठी बोली अभ्यासाची आवश्यकता - भगवंत क्षीरसागर

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन
Body:मराठी भाषा संवर्धनासाठी बोली अभ्यासाची आवश्यकता - भगवंत क्षीरसागर

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन

नांदेड: ‘दैनंदिन व्यवहारात आपण भाषा ही संज्ञा वापरत असलो तरी भाषेला स्वतंत्र अस्तीत्व नसते. भाषेचे अस्तीत्व बोलींमधून व्यक्त होत असते. बोली या स्थलकालसापेक्ष असतात. बोलींच्या अभ्यासातूनच भाषेचा विकास होत असतो, त्यामुळे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी बोलींची जपवणूक गरजेची आहे’ असे प्रतिपादन जेष्ठ कवी भगवंत क्षीरसागर यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने दि.०१ ते १५ जानेवारी या काळात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. पंधरवड्याचे उद्घाटन प्रा.भगवंत क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.शैलजा वाडीकर होत्या तर प्रमुख पाहूणे म्हणून विद्यापीठाच्या मानव्यविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.भगवान जाधव हे उपस्थित होते. डॉ.पृथ्वीराज तौर, डॉ.पी. विठ्ठल, डॉ.वैजनाथ अनमुलवाड, डॉ.रमेश ढगे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
‘मराठी भाषेपुढील आव्हाणे आणि संवर्धनाचे प्रयत्न’ या विषयावर बोलताना कवी भगवंत क्षीरसागर यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी भाषा समृद्धीसाठी उभ्या केलेल्या संस्थांचा व भाषा धोरणाचा उल्लेख केला. प्रसारमाध्यमे, शिक्षणाचे माध्यम, परकीय भाषांचे आक्रमण अशा विविध मुद्द्यांची क्षीरसागर यांनी दीर्घ चर्चा केली.
डॉ.पृथ्वीराज तौर यांनी भाषांतरीत केलेल्या ‘जपानहून आणलेल्या छोट्यांच्या मोठ्या गोष्टी’ या कथासंग्रहाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन यावेळी भगवंत क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ.भगवान जाधव यांनी मराठी भाषेच्या डोळस वापराकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. डॉ.शैलजा वाडीकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. उदघाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ.पी.विठ्ठल यांनी केले. डॉ.पृथ्वीराज तौर यांनी प्रास्ताविक तर डॉ.योगिनी सातारकर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंधरवड्यात विविध कार्यक्रम
-----------------------------
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात कविसंमेलन, भाषा विषयक व्याख्याने, विद्यार्थ्यांच्या स्पर्धा, विकीपिडीया संदर्भातील कार्यशाळा, महाराष्ट्र गॅझेटीयर या विषयावर चर्चासत्र, माहितीपट, परदेशी विद्यार्थ्यांसाठी मराठी, गिरीश कार्नाड यांच्यावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाषा, वाङ्मय संकुलाच्या संचालक डॉ.शैलजा वाडीकर यांनी दिली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.