ETV Bharat / state

जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, ही लढाई जातीसाठी, एकजूट तुटू देऊ नका, समाज बांधवांना आवाहन - Manoj Jarange Patil Became Emotional

Manoj Jarange Patil Became Emotional: नांदेड शहरातील वाडीपाटी परिसरात मनोज जरांगे पाटील यांची आज भव्य सभा पार पडली. या सभेमध्ये जरांगे पाटील भावूक झाल्याचे पहायला मिळाले. भाषण करत असताना त्यांना अचानक अश्रू अनावर झाले होते. (Jarange Patil On Maratha Unity) माझा लढा हा जातीसाठी आहे. जातीला न्याय मिळावा म्हणून ही लढाई सुरू असल्याचं जरांगे यावेळी म्हणाले. समाजाची ही एकजूट तुटू देऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं. सभेला हजारोच्या संख्येनं समाज बांधव उपस्थित होते.

Manoj Jarange Patil
मनोज जरांगे पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 8, 2023, 5:54 PM IST

मराठा आरक्षणाच्या लढाईवर बोलताना मनोज जरांगे पाटील

नांदेड Manoj Jarange Patil Became Emotional: मारतळा (ता. लोहा) येथे शुक्रवारी २४ गावातील मराठा बांधवांनी तयारी करत जरांगे पाटील यांचे स्वागत पुष्पवृष्टी करून वारकरी दिंडी व पारंपरिक पद्धतीने केले उमरा सर्कलच्या पुढाकारातून शंभर एकरचे मैदान सुसज्ज करण्यात आले होते. बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून सुमारे दीड हजार स्वयंसेवकांचा समावेश आहे. बांधवांसाठी दहा हजार पुरी, भाजी पाकीट, १५ हजार बुंदी पाकीट, ४५ क्विंटलची खिचडी, २५ हजार पाणी बॉटल व २५ हजार पाणी पाकिटे व पार्कींगच्या ठिकाणी पाण्याची सोय केली होती. रस्त्यामध्ये जेसीबीच्या साह्याने प्रचंड उत्साहात जरंगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले. (Jarange Patil Nashik Meeting)

अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा करावी लागेल : मराठ्यांनी तमाशात जमिनी घातल्या नाही तर शाळा कॉलेज, बस स्टँडला जागा दिल्या. मराठा समाज हितासाठी कामे केली. हिंगोली येथील ओबीसी मेळाव्यात ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचा प्रत्युत्तर जरांगे पाटील यांनी केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता. त्याप्रमाणे आज हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर दिवसभर चर्चा करावीच लागेल. त्यात सर्व पक्षाचे आमदार सहभागी होऊन मराठा आरक्षण कायदा पारित करण्यासाठी एक होतील, असा विश्वास मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

मराठा आणि कुणबी एकच: मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले, ते मागे घेण्याचे आणि त्या कार्यकर्त्यांना अटक केली जाणार नाही, असे आश्वासन सरकारने दिले होते; परंतु ते पाळले नाही. त्याची किंमत देखील सरकारला मोजावी लागेल, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला. नांदेड जिल्ह्यात पाच ठिकाणी जरांगे पाटील यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले असून ते शुक्रवारी सकाळी जिजाऊनगर येथील सभास्थळी पत्रकारांशी बोलत होते. आम्ही मराठा आणि कुणबी एकच आहोत. त्याअनुषंगाने राज्यात ३० लाखाहून अधिक कुणबी नोंदी असल्याचे पुरावे आढळले आहेत. त्यामुळे शासनाने आता जास्त वेळ न घालवता मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावावा, अशी समाजाची रास्त अपेक्षा आहे. कोण काय बोलतो किंवा कुणाची काय भूमिका आहे, या पेक्षा समाजभावना आणि पुरावे महत्त्वाचे आहेत. आम्ही कुणाच्या बोलण्याला जास्त महत्त्व देत नाही, पण कोणी खेटत असेल तर त्याला पण सोडत नाही, हा मराठ्यांचा इतिहास आहे.

हेही वाचा:

  1. मनोज जरांगे पाटलांना जोरदार धक्का, आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्यास गृहमंत्री फडणवीसांचा नकार
  2. केंद्र सरकारच्या निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको, कांद्याच्या दरात 1 हजार रुपयांनी घसरण
  3. केंद्र सरकारचा कांदा उत्पादकांना धक्का, कांदे निर्यातीवर ३१ मार्च २०२४ पर्यंत बंदी लागू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.