ETV Bharat / state

Nanded crime : भावाशी वाद झाला म्हणून मालकाच्या घरी टाकला दरोडा... तासाभरात दरोडेखोरांना अटक

author img

By

Published : Feb 11, 2023, 1:55 PM IST

भावाशी वाद घातल्याचा राग मनात धरून एकाने राजस्थान येथील काही साथीदारांच्या मदतीने मालकाच्याच घरी दरोडा टाकल्याची माहतीसमोर येत आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास नांदेडच्या वेदांतनगर भागात घडली. पोलिसांना ११२ या क्रमांकावर माहिती मिळताच अवघ्या तासाभरात पाचही दरोडेखोरांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.

Nanded crime
भावाशी वाद झाला म्हणून मालकाच्या घरी टाकला दरोडा

नांदेड : विकास शर्मा हे टाईल्स आणि मार्बलचे व्यापारी आहेत. त्यांच्याकडे गेल्या दीड वर्षापासून प्रदीप शंकरलाल स्वामी हा नोकर कामाला होता. परंतु काही दिवसापूर्वीच शर्मा यांचा प्रदीपच्या भावासोबत वाद झाला होता. त्याचा राग प्रदीपच्या मनात होता. त्यातून त्याने मालकाच्याच घरी दरोडा टाकण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने राजस्थानमधून इतर तिघांना बोलावून घेतले. त्यांना मालकाच्या घरात लाखो रुपयांचा ऐवज असल्याची माहिती दिली. ठरल्यानुसार शुक्रवारी सकाळी पाचही जण वेदांतनगर भागात आले. त्यातील तिघे हे घरात गेले. तर दोघे जण बाहेर टेहळणी करत होते.

शस्त्राचा धाक दाखवत चोरी : यावेळी आरोपींनी शर्मा यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलाला खंजर लावून ८० हजार रुपयांचे मंगळसूत्र काढून घेतले. तसेच कपाटातील पैसे काढण्यास सांगितले. तोच घराबाहेर गोंधळ सुरु झाला होता. त्यामुळे बाहेर थांबलेले दोघे जण अगोदरच पळाले. तर गोंधळाचा आवाज ऐकून तिघांनीही धूम ठोकली. शर्मा यांच्या पत्नीने लगेच ११२ डायल करून माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलविली. वेदांतनगर आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. तिघे जण संशयितरीत्या फिरताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना पकडून अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे मंगळसूत्र आणि खंजर आढळून आले. त्यानंतर या गुन्ह्यातील अन्य दोघांनाही पकडले. त्यात प्रदीप शंकरलाल स्वामी, पवनकुमार रामराम जाठ, राजेंद्रकुमार सुरेशकुमार जाठ, पंकज शंकरलाल स्वामी आणि मनीष नेमीचंद सेन अशी आरोपींची नावे आहेत.

ठाणेदार पवारांची धडाडी : कंट्रोल रूममधून दरोड्याची माहिती मिळताच शहरातील सर्वच पोलीस ठाणे अलर्ट झाले होते. त्यात गोळीबाराच्या घटनेतील आरोपींच्या शोधात असलेले लिंबगावचे सपोनि चंद्रकांत पवार, पोहेकॉ. वाणी, मुंजाजी चवरे, खंडागळे यांच्यासह पोउपनि गोटके, हाके, दत्तराम जाधव, शरदचंद्र चावरे, मनोज परदेशी, रमेश सूर्यवंशी, बालाजी कदम यांनी २ परिसर पिंजून काढला. त्याचवेळी आरोपी त्यांच्या गळाला लागले. दरम्यान, पोलीस अधीक्षक यांनी दरोडेखोरांना पकडणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना रिवॉर्ड जाहीर केले आहे.

कामगारांचे फोटोजवळ ठेवा : घरात किंवा दुकानावर कामासाठी ठेवण्यात आलेले तसेच कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी असलेल्या कामगारांचे फोटो आणि त्यांची माहिती संबधितांनी ठेवणे गरजेच आहे. एखादी घटना घडल्यास पोलिसांना त्यामुळे ओळख पटविण्यास मदत होते. घरात इतर वेळी कामासाठी येणाऱ्या व्यक्तींवरही लक्ष ठेवावे असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.

हेही वाचा : Mumbai Crime : धक्का लागून मोबाईल पडला, रिपेअरिंगच्या पैशावरून झालेल्या भांडणाचे हत्येत पर्यावसन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.