नांदेड - पंजाबमधील एका तरुणाला नांदेडला आणून त्याचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. हा खून जादुटोण्याच्या संशयावरुन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रकरणी एका वृध्द महिलेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गगनदीप सिंह मलकीत सिंह (२३) या तरुणाला लुधियाना व सरहद परिसरातील बलवंत कौर (६०) हिने सत्संग व पुजापाठाचे निमित्त करुन जबरदस्तीने लुधियाना येथून नांदेडला आणले. येथे जादुटोणा व मंत्राचा वापर करुन त्यास या महिलेने वशमध्ये केल्याची परिसरात चर्चा होती. ३ एप्रिलला, दुपारी १ दरम्यान या तरुणाचा कौठा भागातील गोदावरी नदी किनारी खून केल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
याप्रकरणी मलकीतसिंघ सूरज सिंह (रा.मुरार खेड़ा लखीमपूर) यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार पोलिसांनी २ जुलैला बलवंत कौर हीच्या विरुद्ध गुरनं.-३०३/२०१९ कलम ३०२, ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव करत आहेत.