ETV Bharat / state

नांदेडमधील शाळेत खिचडीत शिजली पाल; भोजनातून ५६ विद्यार्थ्यांना विषबाधा

नांदेडमधील सगरोळी येथील श्री.छत्रपती हायस्कुलच्या मध्यान्ह भोजनातील खिचडीत शिजलेल्या पालीमुळे शाळेतील ५६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे.

विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले
author img

By

Published : Jul 24, 2019, 9:56 PM IST

नांदेड - बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या श्री. छत्रपती विद्यालयाच्या मध्यान्ह भोजनातील खिचडीत शिजलेल्या पालीमुळे शाळेतील ५६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. या मुलांवर बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

छत्रपती विद्यालयाच्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मध्यान्ह भोजनात खिचडी देण्यात आली. खिचडी खाल्ल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना चकरा येणे सुरू झाले. एका विद्यार्थिनीने शिक्षकांना खिचडीत निघालेली पाल दाखवली. यानंतर अनेक विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास झाला. त्यानंतर शिक्षकांनी खिजडी खाल्लेल्या विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिक्षक डॉ.नागेश लखमावार यांनी दिली.

शाळेतील ८ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर

उपचार घेत असलेल्या शिवलिंग शंकर शबेटमोगरे (१२), श्रीकांत विठ्ठल मांगीलवार (१२), पूजा संतोष गायकवाड (१४), विजय साहेबराव अंजनबाई (१३), मनोज संजय गरबडे (१४), सौंदर्य विनायक शिंदे (१४), स्वामी मन्मथ स्वामी (१४), महाळसा लक्ष्मण रामटक्के (१३) या विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Intro:नांदेड - खिचडीत पाल शिजली; भोजनातून ५६ विद्यार्थ्यांना विषबाधा

विद्यार्थ्यांवर बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नांदेड : बिलोली तालुक्यातील सगरोळी येथिल संस्कृती संवर्धन मंडळाच्या श्री.छञपती हायस्कुलच्या मध्यान्ह भोजनातील खिचडीत शिजलेल्या पालीमुळे शाळेतील ५६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. Body:
सगरोळीच्या श्री.छञपती हायस्कुलच्या विद्यार्थ्यांना बुधवारी (दि.२४ ) दुपारी १२ वाजेच्या दरम्यान पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात खिचडी देण्यात आली. खिचडी खाल्ल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना चकरा येणे सुरू झाले. एका विद्यार्थिनीने शिक्षकांना खिचडीत निघालेली पाल दाखवली. यानंतर अनेक विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास झाला. शिक्षकांनी ५६ विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात लागलीच दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिक्षक डॉ.नागेश लखमावार यांनी दिली.Conclusion:
८ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर
उपचार घेत असलेल्या शिवलिंग शंकर शबेटमोगरे वय १२ वर्षे, श्रिकांत विठ्ठल मांगीलवार वय १२ वर्षे, पूजा संतोष गायकवाड वय १४ वर्षे, विजय साहेबराव अंजनबाई वय १३ वर्षे, मनोज संजय गरबडे वय १४ वर्षे, सौंदर्य विनायक शिंदे वय १४ वर्षे, स्वामी मन्मथ स्वामी वय १४ वर्षे, महाळसा लक्ष्मण रामटक्के वय १३ वर्षे या विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.