ETV Bharat / state

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेसाठी चाळीस औषध विक्रेत्यांची यादी जाहीर

नांदेड जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत समन्वयासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे पथक नेमण्यात आले आहे. रेमडेसिवीर युक्त असलेले औषधे रास्त दरात रुग्णांसाठी उपलब्ध करुन द्यावेत व इंजेक्शनच्या कंपनीनिहाय किंमती दरफलकावर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

author img

By

Published : Apr 7, 2021, 12:19 PM IST

रेमडेसिवीर इंजेक्शन
रेमडेसिवीर इंजेक्शन

नांदेड - जिल्ह्यात जानेवारीपासून कोविड बाधितांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. यातील गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना द्याव्या लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत नांदेड शहरातील चाळीस औषध विक्रेत्यांची यादी अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने जाहिर करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना काही निर्देशही देण्यात आले आहेत.

रास्त दरात औषधे उपलब्ध करुन देण्याचे निर्देश

सद्यस्थितीत सिप्रिमी, जुबी-आर, रेमेबीन, डेसरेन, कोविफॉर, रॅमडॅक, सिपला, जुबीलियंट, सनफार्मा, मायलॉन, हेट्रोड्रग्स, झायडस कॅडीला या नावाने रेमडेसिवीर युक्त औषधे उपलब्ध आहेत. प्रत्येक औषधांच्या किंमती वेगवेगळया आहेत. यावर नमूद औषधांच्या किंमती (एमआरपी) कंपन्यानुसार जरी वेगवेगळया असल्या तरी, ते औषधे स्वस्त दरात रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात यावे असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने औषध विक्रेत्यांना दिले आहेत.

दर्शनी फलकावर दर लावावेत
इंजेक्शनच्या कंपनीनिहाय किंमती दर फलकावर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या औषधांची विक्री करताना औषध विक्रेत्यांनी डॉक्टरांचे मूळ प्रिस्क्रीप्शन, रुग्णांचा कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट, सिटीस्कॅन रिपोर्ट, रुग्णांचे आधारकार्ड यांच्या प्रती घेवूनच औषध विक्री करावे असे निर्देश देणायात आले आहेत.

शासनातर्फे या इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सर्व स्तरावरुन निर्देश - रोहित राठोड
डॉक्टरांनी हे इंजेक्शन सूचविताना प्रिस्क्रीप्शनवर आपले नाव, शिक्षण, रजिस्ट्रेशन क्रमांक, स्वाक्षरी, रुग्णांचे नाव व तो कोविड पॉझिटिव्ह असल्याचा स्पष्ट अभिप्राय देण्याचे निर्देश औषध प्रशासनाने दिले आहेत. कोविड गंभीर रुग्णांसाठी या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. यात दिलेल्या निर्देशाप्रमाणे नांदेड येथील कोविड रुग्णालय व त्यांच्याशी संलग्न असलेल्या औषध विक्रेत्याकडून औषधांची विक्री दिलेल्या दरात व योग्यरीत्या होते किंवा नाही हे तपासण्यासाठी तीन समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शासनातर्फे या इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सर्व स्तरावरुन निर्देश दिले असून योग्य तो समन्वय साधला जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त रोहित राठोड यांनी सांगितले. कोविड रुग्णांचा उपचार हे शासनाने परवानगी दिलेल्या रुग्णालयाची यादी लक्षात घेवूनच ज्यांना इंजेक्शनची अत्यावश्यकता आहे, अशाच रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली रेमडेसिवीअर हे इंजेक्शन देण्यात येईल. गरज नसताना केवळ अहवाल पॉझिटिव्ह आला म्हणून हे इंजेक्शन शासनाने मान्यता न दिलेले डॉक्टर सुचवत असल्याने बाजारात मागणी वाढल्याचे दिसत आहे.

जास्त दर आकारल्यास इथे संपर्क साधावा
एखादे व्यावसायिक या इंजेक्शनसाठी जास्त किंमतीने दर आकारत असेल तर त्याबाबत अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडे खालील नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.

सु.द. जिंतूरकर – 7588794495

मा.ज.निमसे - 9423749612

र.रा. कावळे - 9923630685

हेही वाचा - LIVE UPDATE : राज्यातील कोरोनासंदर्भातील ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.