नांदेड - जिल्ह्यात आज (गुरुवार) कोरोना रुग्णांच्या संख्येने पुन्हा एकदा मोठा कहर केला आहे. जिल्ह्यात पुन्हा दुसऱ्यांदा शतकी रुग्णसंख्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. वाढत्या बाधित रुग्णांच्या संख्येमुळे व मृत्यूच्या आकड्याने नांदेडकर पुरते हैराण झाले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 117 रुग्ण आढळले असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
नांदेडमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतू, त्यानंतरही बाधित रुग्णसंख्येचा आकडा वाढतच आहे. आजवर जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 1 हजार 685 वर पोहोचली आहे. आज 56 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तर 4 जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 78 एवढी झाली आहे.
आज प्राप्त झालेल्या 656 नमुने तपासणी अहवालापैकी पैकी 457 नमूने निगेटीव्ह आले आहेत व 117 नमून्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 1 हजार 685 झाली आहे. आजवर डिस्चार्ज झालेले रुग्ण 846 असून, उपचार घेत असलेले रुग्ण हे 749 आहेत. प्रलंबित असलेल्या स्वॅबची संख्या 202 एवढी आहे. दररोज वाढत असलेल्या शहरी रुग्णसंख्या बरोबर ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या वेगाने होत असल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
सर्वेक्षण- 1 लाख 49 हजार 242,
घेतलेले स्वॅब- 13 हजार 776,
निगेटिव्ह स्वॅब- 10 हजार 876,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 117,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 हजार 685,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 22,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 56,
मृत्यू संख्या- 78,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 846,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 749,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 202.
नांदेडमध्ये गेल्या 24 तासात 117 कोरोनाबाधितांची भर, तर 4 जणांचा मृत्यू
जिल्ह्यात आज (गुरुवार) कोरोना रुग्णांच्या संख्येने पुन्हा एकदा मोठा कहर केला आहे. जिल्ह्यात पुन्हा दुसऱ्यांदा शतकी रुग्णसंख्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. वाढत्या बाधित रुग्णांच्या संख्येमुळे व मृत्यूच्या आकड्याने नांदेडकर पुरते हैराण झाले आहेत.