ETV Bharat / state

दात आणि तोंडाची स्वच्छता ठेवल्यास कोरोनाची तीव्रता होऊ शकते कमी!

र्वसाधारणपणे औषध दुकानांमध्ये उपलब्ध असलेल्या माउथवॉशमध्ये असलेले घटक क्लोरहेक्झिडीन हे कोरोना विषाणूला निष्क्रिय करण्यात अत्यंत प्रभावी असल्याचे ओरल मेडिसिन व डेंटल रिसर्च या जर्नलमध्ये प्रकाशित एक संशोधन म्हटले आहे.

author img

By

Published : May 7, 2021, 8:41 PM IST

nanded latest news
दात आणि तोंडाची स्वच्छता ठेवल्यास कोरोनाची तीव्रता होऊ शकते कमी!

नांदेड - 'ओरल मेडिसिन व डेंटल रिसर्च' या जर्नलमध्ये एक संशोधन प्रकाशित झाले आहे. या संशोधनानुसार दंत व तोंडाच्या स्वच्छतेची सवय कोरोना विषाणूचा तोंडापासून फुफ्फुसापर्यंतचा प्रसार रोखू शकतो व कोरोना आजाराची तीव्रता कमी करू शकतो, असे सांगण्यात आले आहे. तसेच सर्वसाधारणपणे औषध दुकानांमध्ये उपलब्ध असलेल्या माउथवॉशमध्ये असलेले घटक क्लोरहेक्झिडीन हे कोरोना विषाणूला निष्क्रिय करण्यात अत्यंत प्रभावी असल्याचेही त्यात म्हटले आहे.

प्रतिक्रिया

हिरड्यांचा आजार असलेल्या रुग्णांना कोरोनाचा संभाव्य धोका -

संशोधनात असेही आढळून आले आहे की, कोरोना विषाणू हा हिरड्यांचा आजार असलेल्या रुग्णांच्या लाळेतून प्रत्यक्षपणे हिरड्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करतो व रक्ताच्या माध्यमातून फुफ्फुसांमध्ये सहजपणे प्रवेश करतो. हिरड्यांचा आजार असलेल्या रुग्णांच्या लाळेमध्ये विषाणूचे प्रमाण जास्त असल्यामुळे तिथून फुफ्फुसांच्या रक्तवाहिन्यांना होणारा कोरोनाचा संसर्ग हा श्वसनमार्गातून होणाऱ्या संसर्गापेक्षा जीवघेणा आहे. संशोधन हे ही सांगते की, दातांवर जमलेला मळ (Plaque) आणि हिरड्यांवरील सूज या दोन गोष्टी कोरोना विषाणूला लवकर फुफ्फुसांपर्यंत पोहोचवतो व फुफ्फुसांमधील संसर्ग वाढवतो.

नियमित दंत व तोंडाची स्वच्छता आवश्यक -

नियमित दंत व तोंडाच्या स्वच्छतेच्या सवयी दातांवर मळ जमू देत नाही व हिरड्यांचे आजार प्रभावीपणे कमी करतात. तसेच लाळेमध्ये असलेला कोरोना विषाणू सूज आलेल्या हिरड्यांच्या रक्त वाहिन्यांमधून खूप त्वरित व जास्त प्रमाणात फुफ्फुसांमध्ये शिरकाव करून संसर्ग घडवतो. त्यामुळे दात व तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे.

असा साधा व सोपा उपाय -

दिवसातून दोन वेळा ब्रश करणे, माउथवॉशचा वापर करणे किंवा घरगुती मीठ व हळदीच्या पाण्याच्या गुळण्या करणे. दातांच्या फटीमध्ये राहिलेले अन्न निर्जंतुक धाग्याच्या (Dental Floss) सहाय्याने काढणे. हिरड्यांचे आजार असतील, तर वेळीच उपचार करून घेणे. अशा गोष्टी केल्यास आपण कोरोना विषाणूचा प्रभाव कमी करू शकतो. दंत आरोग्य चांगले ठेवा व कोरोनाविषाणूला निष्क्रिय करा असे आवाहन दंत आरोग्य तज्ञ डॉ.रुपाली माने यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.

हेही वाचा - नितीन देसाईंच्या स्टुडिओला आग, जोधा अकबर किल्ल्याचा सेट जळाला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.