नांदेड - रुग्ण अॅडमीट असल्याचा बनाव करुन एका महिलेचे दागिणे पळविल्याची घटना घडली. ही घटना २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता देगलूर शहरात घडली.
देगलूर तालुक्यातील नागराळ येथील रहिवासी सुभद्राबाई दत्तात्रय काठेवाडे या सोमवारी सकाळी देगलूर बसस्थानक परिसरातून जात होत्या. जवळच असलेल्या मुंडे रुग्णालयामध्ये आमचा पेशंट अॅडमीट असून तुमची थोडीशी मदत हवी असल्याची त्याने विनंती केली. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच डॉक्टरांना आवडत नाही, म्हणून गळ्यातील सोन्याचे दागिने पिशवीत काढून ठेवण्यास त्याने सुभद्राबाई यांना सांगितले. त्यानंतर दागिने ठेवलेल्या पिशवीला गाठ मारतो म्हणून चोरट्याने सुभद्राबाई यांच्या नकळत दागिने चोरुन पोबारा केला.
फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यावर सुभद्राबाई यांनी २३ एप्रिलला देगलूर ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चोरी झालेल्या दागिन्याची किंमत २७ हजार रुपये आहे.