ETV Bharat / state

अज्ञात चोरट्याने झोपलेल्या महिलेचे दागिने केले लंपास, गुन्हा दाखल - jewellery worth stolen

धर्माबाद तालुक्यातील बेल्लुर (खु) गावात अज्ञात चोरट्यांनी महिला झोपलेली असता, तिचे दागिने पळवल्याची घटना घडली आहे.

jewellery worth stolen in Bellur (kh) Village dharmabad nanded
अज्ञात चोरट्याने झोपलेल्या महिलेचे दागिने केले लंपास, गुन्हा दाखल
author img

By

Published : May 17, 2020, 10:25 AM IST

नांदेड - धर्माबाद तालुक्यातील बेल्लुर (खु) गावात अज्ञात चोरट्यांनी महिला झोपलेली असता, तिचे दागिने पळवल्याची घटना घडली आहे. यामुळे बेल्लुर गावात भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात धर्माबाद तालुक्यात पहिल्यांदाच चोरीची घटना घडली.

अज्ञात चोरट्याने झोपलेल्या महिलेचे दागिने केले लंपास

बेल्लुर येथील अनसाबाई कांबळे या झोपलेल्या असता, त्यांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी पळवले. सकाळी जाग आल्यानंतर त्यांना आपले दागिने चोरीला गेल्याचे समजले. तेव्हा त्यांनी दागिने चोरीला गेल्याची माहिती धर्माबाद पोलिसांना दिली. त्यानंतर राम कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - नांदेडमध्ये अडकलेले वायनाडमधील विद्यार्थ्यांसह कर्मचारी केरळला रवाना

हेही वाचा - मजुरांच्या कॅम्पला भीषण आग; मजूर परराज्यात गेल्याने जीवितहानी टळली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.