ETV Bharat / state

नांदेड आणि हिंगोलीमधील अंतर्गत व्यवहार लवकरच सूरू करणार - खासदार पाटील - नांदेड आणि हिंगोलीमधील अंतर्गत व्यवहार लवकरच सूरू करणार

नांदेड आणि हिंगोली हे 2 जिल्हे सध्या ग्रीन झोनमध्ये आहेत. त्यामुळे या 2 जिल्ह्यामधील अंतर्गत व्यवहार लवकरच सूरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मच खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केले.

hemant patil
खासदार हेमंत पाटील
author img

By

Published : Apr 18, 2020, 7:14 PM IST

नांदेड - कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. अशा काळात काही जिल्हे हे ग्रीन झाेनमध्ये आहेत. त्या जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात नियम शिथील करण्याचे प्रयत्न चालू आहेत. नांदेड आणि हिंगोली हे 2 जिल्हे सध्या ग्रीन झोनमध्ये आहेत. त्यामुळे या 2 जिल्ह्यामधील अंतर्गत व्यवहार लवकरच सूरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केले.

खासदार हेमंत पाटील

नांदेड, हिंगोली व यवतमाळ या जिल्ह्याचे कार्यक्षेत्र माझ्या मतदारसंघात येते. यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे काही रुग्ण आहेत. पण नांदेड आणि हिंगोली सध्या ग्रीन झोनमध्ये आहे. हिंगोली जिल्ह्यात जो एक रुग्ण होता. त्याचाही रिपार्ट आता निगेटिव्ह आला आहे. या काळात शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्याची शेतातील हळद, मका, फळे, भाजीपाला ही पीके अडचणीत सापडली आहेत. अनेक शेतकऱ्यांचा कापूस विकायचा राहून गेला आहे. याबाबत तातडीने व्यवहार सुरू होणे आवश्यक असल्याचे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे या संदर्भात मागणी केली आहे. लवकरच नांदेड आणि हिंगोलीमधील अंतर्गत व्यवहार सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पाटील म्हणाले.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.