टपाल खात्याचे बदलते स्वरूप; डाक सेवेसह आता बँकिंगची सेवाही घरपोच - corona pandemic and post office
नांदेडच्या पोस्ट खात्याने निराधाराच्या घरी, शेतकऱ्याच्या बांधावर तर रुग्णांच्या बेडवर सेवा देणारी यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. यात पोस्ट खात्याचे कर्मचारी बँकिंग सेवा घरपोच देत आहेत.
नांदेड - जसा काळ बदलला तसा कालांतराने आपल्यात बदल करून घेतला तरच स्पर्धेत टिकू शकाल त्यासोबत स्पर्धा करू शकाल. हेच जाणून घेऊन आता टपाल खात्यातही अनेक बदल जाणवू लागले आहेत. आपल्याला प्रत्यक्ष घरी येऊन सेवा देणारा पोस्टमन आता बँकिंग सेवा घरपोच सेवा देत आहे. निराधाराच्या घरी, शेतकऱ्याच्या बांधावर तर रुग्णांच्या बेडवर सेवा देणारी यंत्रणा नांदेडच्या पोस्ट खात्याने उपलब्ध करून दिली असून जिल्ह्यात बँकिंग सेवेमध्ये क्वचितच असे पाहायला मिळते.
हेही वाचा - नांदेडच्या सचखंड गुरुद्वारातून जत्था दिल्लीला रवाना; 50 सेवेकरी करणार लंगर सेवा
हेही वाचा - नांदेडमध्ये भारत बंदला चांगला प्रतिसाद; अनेक पक्ष, संघटना बंदमध्ये सहभागी