ETV Bharat / state

नांदेडला दिलासा; सलग दुसऱ्या दिवशीही ३० अहवाल निगेटिव्ह! - news about corona virus

बुधवारी सकाळी 57 अहवालांपैकी 53 अहवाल निगेटीव्ह आले होते. त्यांनतर सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 30 अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

नांदेडला दिलासा; सलग दुसऱ्या दिवशीही ३० अहवाल निगेटिव्ह!
author img

By

Published : May 6, 2020, 7:44 PM IST

नांदेड - शहरात सलग तीन दिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्हा चांगलाच हादरून गेला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून एकही रुग्ण पॉझिटिव्ह न मिळाल्याने नांदेडकरासाठी दिलासादायक परिस्थिती आहे. बुधवारी सकाळी 57 अहवालांपैकी 53 अहवाल निगेटीव्ह आले होते. त्यांनतर सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 30 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. मागच्या दोन दिवसांपासून कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण न सापडल्याने प्रशासनावरील दडपणही थोडे कमी झाले आहे. ही नांदेडकरांसाठी दिलासा देणारी माहिती आहे.

In Nanded, 30 reports of corona virus have come negative
नांदेडला दिलासा; सलग दुसऱ्या दिवशीही ३० अहवाल निगेटिव्ह!

नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार 382 स्वॅब घेण्यात आले. त्यात 1 हजार 291 स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. 34 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तिघांचा कोरेानाच्या आजारामुळे मृत्यू झाला. चार कोरोनाग्रस्त पळून गेले असल्याने 27 जणांवर उपचार सुरु आहेत. खासगी रुग्णालयातील सर्वच्या सर्व चाळीस जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यातील सकाळी 19 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले होते. सायंकाळी 21 जणांचे अहवाल निगेटीव्ह निघाले आहेत. भोकर येथील 9 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. येथील नागरिकांचे ही स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंट भोसीकर यांनी दिली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती -

आत्तापर्यंत एकूण संशयित 1551
एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या1413
क्वारंटाईन कालावधी पूर्ण 428
अजून निरीक्षणाखाली असलेले 135
पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 182
घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 1231
आज तपासणीसाठी घेतले नमुने 25
एकुण नमुने तपासणी1382
एकुण पॉझिटीव्ह रुग्ण34
पैकी निगेटीव्ह 1291
नमुने तपासणी अहवाल बाकी32
नाकारण्यात आलेले नमुने 5
अनिर्णयीत अहवाल 19
कोरोना बाधित मृत रुग्णांची संख्या 3

जिल्ह्यात बाहेरून आलेल्या एकून 91379 प्रवाश्याना होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या हातावर शिक्के ही मारण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.