ETV Bharat / state

अर्धापुरात चोरट्यांनी ६ दुकाने फोडली, पावणे दोन लाखाचा ऐवज लंपास

अर्धापूर- नांदेड रस्त्यावर बालाजी मोटरवार यांचे बालाजी ट्रेडिंग कंपनी हे दुकान आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून दुकानात प्रवेश केला व दुकानातील कपाट फोडून कपाटातील सुमारे दीड-लाखाची रोख रक्कम लंपास केली. तसेच, कपाटातील कागदपत्रांची नासधूसही केली.

अर्धापुरात चोरट्यांनी ६ दुकाने फोडली
अर्धापुरात चोरट्यांनी ६ दुकाने फोडली
author img

By

Published : Nov 1, 2020, 6:46 PM IST

नांदेड - अर्धापूर शहरातील अर्धापूर-नांदेड रस्त्यावरील चार दुकानांमध्ये चोरट्यांनी दरोडा टाकला. ही घटना आज उघडकीस आली. दुकानांबरोबरच चोरट्यांनी एका साखर कारखान्याच्या कार्यालयाचे कुलूप तोडले व एका पत्रकाराचे कार्यालय देखील फोडले. यात चोरट्यांनी पावणे दोन लाखांची रक्कम लंपास केली.

अर्धापूर- नांदेड रस्त्यावर बालाजी मोटरवार यांचे बालाजी ट्रेडिंग कंपनी हे दुकान आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून दुकानात प्रवेश केला व दुकानातील कपाट फोडून कपाटातील सुमारे दिड-लाखाची रोख रक्कम लंपास केली. तसेच, कपाटातील कागदपत्रांची नासधूसही केली. याच दुकानाच्या शेजारी गंगाधर राऊत यांचे जयवंत ट्रेडिंग कंपनी हे ठिबक संच विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी या दुकानाचे देखील शटर वाकवून दुकानात प्रवेश केला व काऊंटर मधील २ हजार २५० रुपये लंपास केले. तर, याच दुकानाच्या शेजारी गंगाधर सिनगारे यांचे मारोती मशीनरी हे दुकान आहे. या दुकानातून ३ हजार रुपये लंपास करण्यात आले. तसेच, संतोष तिडके यांच्या दुकानातून ६ हजार लंपास करण्यात आले.

ठसे तज्ज्ञ पथकाला पाचारण

ही चार दुकाने फोडल्यानंतर चोरट्यांनी याच भागातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयाचे कुलूप तोडले. तर, पत्रकार उदय गुंजकर यांचे संपर्क कार्यालय फोडून २० हजार लंपास केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून चोरांचा माग काढण्यासाठी नांदेड येथील श्वानपथकाला व ठसे तज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने चोरीच्या ठिकाणी व परिसरात तपास केला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब देशमुख, पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.टी नांदगावकर, पोलीस उपनिरीक्षक बळीराम राठोड यांनी भेट देवून घटनेची माहिती घेतली व तपासा संबंधी सूचना केल्या.

चोरट्यांना लवकरच जेरबंद करू- पो.नि विष्णूकांत गुट्टे

दरम्यान, पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून तपासा संदर्भात योग्य त्या सूचना केल्या आहेत. चोरट्यांना लवकरच जेरबंद करू, अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे यांनी दिली.

हेही वाचा- बंदुकीचा धाक दाखवून ज्वेलर्स दुकान लुटण्याचा प्रयत्न; नांदेडच्या मुदखेड शहरातील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.