ETV Bharat / state

पदभरतीच्या नावाखाली कोणी पैशाची मागणी केल्यास पोलिसांशी संपर्क साधा - नांदेड जिल्हा प्रशासन - Setu Samiti recruitment money demand

सेतू समितीच्यावतीने होणाऱ्या विविध पदांच्या कंत्राटी पदभरतीच्या नावाखाली अज्ञात व्यक्तींकडून ऑनलाईन पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची जिल्हा प्रशासनाने तात्काळ गंभीर दखल घेतली असून पोलीस विभागातर्फे यावर योग्य ती कार्यवाही केली जात आहे. उमेदवारांशी कोणी संपर्क साधून जर काही मागणी करत असेल तर याची तात्काळ माहिती पोलीस विभागाला कळवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Office of the Superintendent of Police
पोलीस अधीक्षक कार्यालय
author img

By

Published : Jun 10, 2021, 9:46 PM IST

नांदेड - सेतू समितीच्यावतीने होणाऱ्या विविध पदांच्या कंत्राटी पदभरतीच्या नावाखाली अज्ञात व्यक्तींकडून ऑनलाईन पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची जिल्हा प्रशासनाने तात्काळ गंभीर दखल घेतली असून पोलीस विभागातर्फे यावर योग्य ती कार्यवाही केली जात आहे. उमेदवारांशी कोणी संपर्क साधून जर काही मागणी करत असेल तर याची तात्काळ माहिती पोलीस विभागाला कळवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा - नांदेड रेल्वे विभागात आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग जागरूकता दिवस साजरा

पदभरतीसाठी अज्ञात व्यक्तीकडून पैशांची मागणी

नांदेड जिल्हा कार्यालयांतर्गत सेतू समितीच्यावतीने होणाऱ्या विविध पदांच्या कंत्राटी पदभरती संदर्भातील पदभरतीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास काही विद्यार्थ्यांनी अर्ज केली आहेत. तशी त्यांची नियमानुसार प्रतिक्षा निवड यादी तयार झाली आहे. परंतु, या निवड यादीतील विद्यार्थ्यांना अज्ञात व्यक्तींकडून पैशाची मागणी वारंवार होत आहे.

प्राप्त तक्रारींचे अर्ज सायबर सेलकडे

10 जून रोजी काही पात्र विद्यार्थ्यांना अज्ञात व्यक्तींकडून त्यांच्या खात्यात पैसे भरण्याच्या संदर्भात फोन करून पैशाची मागणी झाली आहे. यापुढे तसे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे, जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त तक्रारीचे अर्ज योग्य त्या कार्यवाहीसाठी सायबर सेल व पोलीस विभागाकडे पाठविण्यात आली आहेत.

हेही वाचा - कोरोनामुळे पालक गमावलेल्या एक हजार मुलांना दत्तक घेण्याचा पुरुषोत्तम धोंडगेंचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.