नांदेड : शाळकरी विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून पोषण आहार म्हणून मध्यांन्न भोजन दिलं जातं..त्यातही निकृष्ठ जेवण आणि घोटाळा झालेली अनेक उदाहरणे आपण पाहिलीयेत,मात्र शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना इडली-सांबर देणारी शाळा नांदेड जिल्यात चर्चेचा विषय ठरलीय,पाहुयात ई टिव्ही भारतचा हा खास वृत्तांत.
इडलीचा उपक्रम : दररोजचा मेनू दाळ खिचडी, वाटाणा खिचडी आहे. रोज एक ते एक पदार्थ खाऊन मुलांना कंटाळा येतो. यासंबंधी सर्व शिक्षकांशी चर्चा करून इडलीचा उपक्रम राबवण्यासाठी शिक्षकांनी होकार दिला असे शाळेच्या मुख्यध्यापिका संगीता बोटलावाड यांनी म्हटले आहे. आठवड्यातील दोन दिवस शनिवार व बुधवार मुलांना इडलीचा स्वाद दिला जातो. यासाठी लागणारे साहित्य तयार करण्यासाठीचे भांडे सर्वांच्या खर्चातून आणण्यात आले आहे. विशेष म्हणजे नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इडली दिली जाते.
मध्यांन्न भोजनात डोस्याचाही समावेश : कारल्याच्या राजर्षी शाहु माध्यमिक विद्यालयात इडली-सांबरची चर्चा आता जिल्हाभरात होऊ लागली आहे. आठवड्यातून बुधवारी शनिवारी इडली-सांबर विद्यार्थ्यांना दिली जाते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या उपक्रमाला संस्थेनेही साथ देत आर्थिक मदतही करत आहे. आता या विद्यार्थ्यांच्या मध्यांन्न भोजनात डोस्याचाही समावेश होणार आहे.
उपक्रम शासन स्तरावर राबवण्यासाठी प्रयत्न : निकृष्ट शालेय पोषण आहाराबाबत, घोटाळ्याबाबत राज्यभरात अनेक तक्रारी प्राप्त होतात. मात्र, कारल्याच्या राजर्षी शाहू विद्यालयाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाच अनुकरण इतर शाळांनीही घेतल्यास विद्यार्थ्यांच्या जडण-घडणीत आमूलाग्र बदल नक्कीच घडेल. हा उपक्रम शासन स्तरावर राबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिक्षण अधिकारी प्रशांत दिग्रस्कर यांनी सांगितले.
शालेय पोषण आहारामध्ये अभिनव प्रयोग : इतर शाळांनी उपक्रम करता येईल का पहावे. कारला येथील राजश्री शाहू माध्यमिक विद्यालय यांनी शालेय पोषण आहारामध्ये अभिनव प्रयोग केला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन विद्यार्थ्यांना दररोज एक ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो. कारला शाळेचा उपक्रम अनुकरणीय आहे. सर्व शाळांनी या प्रकारचा उपक्रम करता येईल का पहावे असे शिक्षण अधिकारी म्हणाले.