नांदेड: जिल्ह्यातील बारसगाव (ता.अर्धापूर) शिवारात बुधवारी रात्री दोनच्या सुमारास पतीकडून पत्नीवर दगडाने मारहाण केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणी पतीविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक केली आहे.
पाच वर्षांपूर्वी झाला होता विवाह
गत पाच वर्षांपुर्वी हदगाव तालुक्यातील चोरंबा येथील केदारनाथ तुकाराम बुलबुलेचा विवाह दांडेगाव येथील मारोती गिरे यांची मुलगी वेदिकाशी झाला होता. त्यांना तीन वर्षाची आरती नावाची एक मुलगी आहे. वेदिकाचे वडील व पती बारसगाव शिवारातील शेतामध्ये सालगडी म्हणून काम करतात. दि.२२ रोजी वेदिकाच्या माहेरी जेवनाचा कार्यक्रम होता. यावेळी केदारनाथ वेदिकाला जबरदस्तीने आखाड्यावरून घेऊन गेला व दारू पिण्यास विरोध का केला म्हणून तिच्यासोबत वाद केला. तसेच वेदिकाला दगडाने मारहानही केली. या मारहानीत वेदिकाचा मृत्यू झाला.
खूनाचा गुन्हा दाखल
अर्धापूर तालुक्यातील आमराबाद तांडा शिवारात मंगळवारी दि.२३ जुन रोजी सकाळी दोन च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. पत्नी वेदिका बुलबुले हिच्या डोक्याला व तोंडावर दगडाने जबर मारहाण केल्याने जखमी झालेल्या वेदिकाचा मृत्यू झाला. आरोपी पती केदारनाथ बुलबुलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनास्थळी फॉरेन्सिक लँबच्या तज्ञ टीमने तपासणी केली आहे.