ETV Bharat / state

Hottal Cultural Festival : 9 ते 11 एप्रिल कालावधीत नांदेडमध्ये होट्टल महोत्सवाचे आयोजन - hottal festival in nanded

जिल्हा प्रशासन  व महाराष्ट्र पर्यटन संचालनालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने होट्टल सांस्कृतिक महोत्सव ( Hottal Cultural Festival 2022 ) चे आयोजन केले जात आहे. दिनांक 9 ते 11 एप्रिल या तीन दिवसीय कालावधीत देगलूर जवळील होट्टल येथील मंदिर परिसरात हे आयोजन होणार आहे.

Hottal Cultural Festival
Hottal Cultural Festival
author img

By

Published : Mar 25, 2022, 7:56 PM IST

नांदेड :- मराठवाड्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख ठरलेल्या “ होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचे ” आयोजन 9 ते 11 एप्रिल या कालावधीत होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्राथमिक बैठक संपन्न झाली.

Hottal Cultural Festival
9 ते 11 एप्रिलला होणार महोत्सव

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबाबत जिल्ह्यातील सर्व यंत्रणाना सकारात्मक सहभाग घेवून हा महोत्सव अधिक चांगला होण्याबाबतचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. या निर्देशानुसार बैठकीत विविध नियोजनाचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आढावा घेतला.

मान्यवरांची उपस्थिती

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, देगलूरचे उपविभागीय दंडाधिकारी शक्ती कदम, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महोत्सवाच्या पुर्व तयारीबाबत आढावा घेवून विविध समित्या स्थापन करण्यात येत आहेत. या महोत्सवाला अधिकाधिक पर्यटक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारे व्यक्ती-रसिक मोठया संख्येने सहभागी होतील असा विश्वास डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. या तीन दिवशीय महोत्सवामध्ये स्थानिक कलाकारासह राष्ट्रीय पातळीवरील कलाकारांनाही ऐकण्याची संधी मिळणार आहे. होट्टल येथील पर्यटनाला चालना मिळावी यादृष्टीने या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन राज्याच्या पर्यटन विभागामार्फत केले जात आहे.

Hottal Cultural Festival
होट्टल महोत्सवाचे आयोजन
पर्यटकास चालना

जो समृद्ध वारसा नांदेड जिल्ह्याला मिळाला आहे त्याच्या जपणुकीसाठी, पिढ्यानपिढ्या ज्या कला येथे विकसीत होत आल्या आहेत. त्याला व्यासपीठ मिळावे, स्थानिक प्रतिभावान कलाकारांना संधी उपलब्ध व्हावी. त्यांच्या कलेला चालना मिळावी यादृष्टीने जिल्हा प्रशासन होट्टल महोत्सवाकडे पाहत आहे. बहुप्रतिक्षेत असलेल्या होट्टल सांस्कृतिक महोत्सवाचा मूळ हेतूच जिल्ह्यातील सांस्कृतीक वैभवाला अधोरेखीत करण्याचा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

होट्टल सांस्कृतिक महोत्सव 2022
जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र पर्यटन संचालनालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने होट्टल सांस्कृतिक महोत्सव 2022 चे आयोजन केले जात आहे. दिनांक 9 ते 11 एप्रिल या तीन दिवसीय कालावधीत देगलूर जवळील होट्टल येथील मंदिर परिसरात हे आयोजन होणार आहे. स्थानिक कलाकारांना अधिकाधिक संधी मिळावी व महोत्सवाची पुढील रुपरेषा ठरावी याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संबंधितांना निर्देश दिले. याचबरोबर महोत्सव काळात स्थानिक कलाकारांच्या सादरीकरणासाठी राखीव वेळही ठेवण्यात आली आहे.

28 मार्चपर्यंत स्थानिक कलाकारांना अर्ज करण्याची संधी
ज्या स्थानिक कलाकारांना, कलाकारवृंद यांना त्यांच्याकडील अनुभव, वैशिष्ट्य व सादर करावयाच्या कार्यक्रमांच्या रूपरेषेसह दिनांक 28 मार्च 2022 पर्यंत लेखी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. हे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दंडाधिकारी शाखेत कार्यालयीन वेळेत स्विकारले जातील. या अर्जावर होट्टल सांस्कृतिक महोत्सव 2022 अंतर्गत अर्ज असे स्पष्ट नमूद केलेले व विहित कालावधीत आलेले अर्ज स्विकारले जातील, असेही जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - Sanjay Raut On Pen Drive Case : 'पेनड्राईव्ह यांच्या घरात जन्माला येतात का?' राऊतांचा फडणवीसांना टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.