नांदेड - बहुचर्चित धान्या घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने नांदेडचे तत्कालीन पुरवठा अधिकाऱ्याची माहिती मागवली आहे. न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेमुळे या घोटाळ्यातील बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांच्या काळात नांदेडमध्ये धान्य घोटाळा झाला होता, याच वेणीकरांच्या काळात परभणी जिल्ह्यातही असाच धान्य घोटाळा झाला होता. मात्र, नांदेडमधील हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर परभणीच्या धान्य घोटाळ्याच्या गुन्ह्याची माहिती लपवल्याचे उघड झाले आहे.
त्यामुळे उच्च न्यायालयाने वेणीकर यांच्याबाबत माहिती देण्याचे आदेश नांदेडच्या जिल्हाधिकाऱयांना दिले आहेत. 11 जूनला उच्च न्यायालयात याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.