ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात पाच ठिकाणी उभारली जाणार हेलिपॅड - News about Guardian Minister Ashok Chavan

नांदेड जिल्ह्यातील पाच ठिकाणी हेलिपॅड उभारली जाणार आहेत. जिल्ह्यातील माहूर, किनवट, देगलूर, भोकर व मुखेड या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात येणार आहेत.

helipad-to-build-five-locations-in-nanded-district
नांदेड जिल्ह्यात पाच ठिकाणी उभारली जारणार हेलिपॅड
author img

By

Published : Jan 23, 2020, 10:28 AM IST

नांदेड - राज्यात तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्याचे पहिले काम नांदेड जिल्ह्यात सुरू होणार आहे. जिल्ह्यातील माहूर, किनवट, देगलूर, भोकर व मुखेड या पाच ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे. जागेची पाहणी करून शासनाकडे प्रस्तावही सादर करण्यात आला आहे.

हेही वाचा - नांदेड महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी १५ अर्ज दाखल

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या 'टॉप-४५' कामांच्या यादीत हेलिपॅडच्या कामाचा सर्वप्रथम समावेश करण्यात आला आहे. या यादीमध्ये शहरातील १९ तर भोकर मतदारसंघातील १३ कामांचा समावेश असून, उर्वरित कामे जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमधील आहेत. नांदेडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर अशोकराव चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनासोबत घेतलेल्या बैठकीत कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करून दिला. त्यानुसार ४५ कामांचे प्रस्ताव तत्काळ सादर करून निधी मागणीसाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी या बैठकीत केल्या.

हेही वाचा - 'त्या' विधानाचा विपर्यास केला; मंत्री अशोक चव्हाण यांचे स्पष्टीकरण

यातील बहुतांश कामे सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडीत असली तरी विविध शासकीय कार्यालये व महामंडळांना पाठपुरावा करून ती पूर्ण करावी लागणार आहेत. राज्यातील प्रत्येक तालुक्यात हेलीकॉप्टरसाठी हेलिपॅड उभारण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने पूर्वीच घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यात याची अंमलबजावणी करण्याचे आदेश चव्हाण यांनी दिले. पहिल्या टप्प्यात माहूर, किनवट, देगलूर, भोकर व मुखेड या पाच तालुक्यात काम सुरू करावेत, अशी सूचना त्यांनी केली.

Intro:नांदेड : जिल्ह्यात पाच हेलिपॅड उभारणार.
- पालकमंत्र्यांनी दिली टॉप- ४५ ची यादी.
- नांदेड शहरात १९ तर भोकर मतदार संघात १३ कामे.

नांदेड : राज्यात तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्याचे पहिले काम नांदेड जिल्ह्यात सुरू होणार आहे. जिल्ह्यातील माहूर, किनवट, देगलूर, भोकर
व मुखेड या पाच ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुर्वतयारी केली असून, जागेची पाहणी करून शासनाकडे प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. Body:
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या टॉप प्रायरीटीच्या 'टॉप-४५' कामांच्या यादीत
हेलिपॅड च्या कामाचा सर्वप्रथम समावेश करण्यात आला आहे. या यादींमध्ये शहरातील १९ तर भोकर मतदारसंघातील १३ कामांचा समावेश असून, उर्वरित कामे जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमधील आहेत.
नांदेडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर ना. अशोकराव चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनासोबत घेतलेल्या बैठकीत कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करून दिला. त्यानुसार ४५ कामांचे प्रस्ताव तात्काळ
सादर करून निधी मागणीसाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी या बैठकीत केल्या.Conclusion:यातील बहुतांश कामे सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडीत असली तरी विविध शासकीय कार्यालये व महामंडळांना पाठपुरावा करून ती पूर्ण करावी लागणार आहेत.राज्यातील प्रत्येक तालुक्यात
हेलीकॉप्टरसाठी हेलिपॅड उभारण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने पुर्वीच घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यात याची अंमलबजावणी करण्याचे आदेश ना.चव्हाण यांनी दिले. पहिल्या टप्प्यात माहूर,किनवट, देगलूर, भोकर व मुखेड या पाच तालुक्यात काम सुरू करावेत अशी सूचना त्यांनी केली.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.