नांदेड - शहरात रविवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. दिवसभर कडक ऊन पडले होते. मात्र, अचानकच विजांचा कडकडाट सुरू होत वादळी वाऱ्यासह पाऊस आला. पावसाने सर्वत्र गारवा पसरला. यामुळे, उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणातील उकाड्याने हैराण झालेल्या नांदेडकरांना दिलासा मिळाला.
एकीकडे वातावरणाील गारव्यामुळे नागरिक सुखावले असतानाच वाऱ्यामुळे शहरातील झाडांची तसेच वीजेच्या खांबांची पडझड झाली. यामुळे, बराच वेळ शहरातील लाईट गेली होती. अशात नागरिकांना काही प्रमाणात त्रासही सहन करावा लागला आहे.