ETV Bharat / state

अर्धापूर तालुक्यात मुसळधार पाऊस, पिकांचे मोठे नुकसान

जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात व परिसरात सोमवारी रात्री १२:३० वाजताच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला.

अर्धापूर तालुक्यात जोरदार पाऊस
author img

By

Published : Mar 26, 2019, 9:07 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात व परिसरात सोमवारी रात्री १२:३० वाजताच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत. तर परिसरातील केळी, गहू, हळद, ज्वारी व पपई पिकांचे मोठ्या प्रमाणावार नुकसान झाले आहे.

अर्धापूर परिसरातील शेणी, लहान, लोणी, चाभरा, कारवाडी, निमगाव व चिचबन परिसरात सोमवारी रात्री विजांच्या कडकडाटसह तुफान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी पाण्याच्या कमतरतेमुळे केळीची लागवड कमी झाली आहे. त्यामध्ये अवकाळी पावसामुळे केळीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसणार आहे.

अर्धापूर तालुक्यात जोरदार पाऊस

रात्री अचानक आलेल्या पावसाचा फटका अर्धापूर परिसरातील हळद मजूरांनाही बसला आहे. कामानिमित्त हळदमजूर पार्डी परिरातील आले आहेत. ते शेतातच राहत असल्याने रात्री आलेल्या वादळी वाऱ्यामुळे त्यांच्या राहण्याचे पाले वादळी वाऱ्यात उडून गेली होती. त्यामुळे शेतातील जनावरे किरकोळ जखमी झाली आहेत.

परिसरात हळद काढणी व शिजवण्याचे काम सुरू असल्याने शेतकरी व मजुर रात्री शेतातच मुक्कामाला होते. त्यावेळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे एकच धांदल उडाली. वाऱ्यामुळे विजेचे खांब कोसळून पडले आहेत. त्यामुळे याठिकाणी १२ तास वीजपुरवठा खंडित झाला होता.

Intro:अर्धापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; केळीसह विविध पिकांना मोठा फटका..! Body:अर्धापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; केळीसह विविध पिकांना मोठा फटका..!

नांदेड: जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्यात व परिसरात सोमवारी रात्री १२:३० सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह झालेल्या सोसाट्याचा वादळी वाऱ्यासह पावसाने हाहाकार माजविला असून घरावरील पत्रे उडून परिसरातील केळी, गहू, हळद, ज्वारी व पपई इत्यादी पिकाचे मोठे नुकसान झाले.
अर्धापूर परिसरातील शेणी, लहान, लोणी, चाभरा, कारवाडी, निमगाव व चिचबन परिसरात सोमवारी रात्री विजांच्या कडकडाटसह तुफान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पिकाचे मोठे नुकसान केले आहे. यावर्षी अगोदरच पाण्याच्या कमतरतेमुळे केळीची लागवड कमी झाली होती. काही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने केळीच्या बागा जोपासल्या आहेत, पण सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागेचे मोठे नुकसान झाले आहे. यात शेतकऱ्यांना लाखो रुपयाचा फटका बसणार आहे. अचानक झालेल्या या अस्मानी संकटाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. तसेच अचानक आलेल्या संकटाने शेतकऱ्यांची एकच धावपळ होऊन मोठी तारांबळ उडाली. रात्री उशिरा अर्धापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर परराज्यातील व जिल्ह्यातील मजूरदार हळद कामानिमित्ताने पार्डी परिरातील आले असून त्याचा रानातच मुक्काम असल्याने रात्री आलेल्या वादळी वाऱ्याचा फटका बसला. त्याच्या राहण्याचे पाल वादळी वाऱ्यात उडून गेली होती. त्यामुळे त्याची मोठी तारांबळ उडाली तसेच शेतात असलेल्या गायी, म्हशी, बैल आदी जनावरे किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच शेतातील आखाडे पूर्णतः उद्ध्वस्त झाले असून शेतातील मजुरांना याचा मोठा फटका बसला आहे. अर्धापुर तालुक्यात केळीच्या बागावर याचा मोठा परिणाम झाला आहे. तसेेेच मोठ्या प्रमाणावर केळीच्या पिकाला वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. टरबुजाच्या मळ्याना वादळी वाऱ्याचा फटका बसला
परिसरात मोठ्या प्रमाणात हळद काढणी व शिजवण्याचे काम सुरू असल्याने शेतकरी व मजुरदार रात्री शेतातच मुक्कामास असल्याने अचानक वादळी वाऱ्यामुळे एकच धांदल उडाली . वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब कोसळून पडले. १२ तास वीजपुरवठा खंडित झाला होता.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.