ETV Bharat / state

नांदेडमध्ये पन्नास लाखांच्या गुटख्यासह ट्रक जप्त, विमानतळ पोलिसांची कारवाई - nanded police news

नांदेडमध्ये विमानतळ पोलिसांनी ५९ लाख ७७ हजाराचा गुटखा जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पन्नास लाखांच्या गुटख्यासह ट्रक जप्त
author img

By

Published : Aug 29, 2019, 10:01 AM IST

नांदेड - शहराच्या बाहेरून वसमतकडे जाणारा लाखो रुपयाचा गुटखा व ट्रक विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या फिर्यादीवरून विमानतळ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण ५९ लाख ७७ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पन्नास लाखांच्या गुटख्यासह ट्रक जप्त

शहरातील आसना पुलाजवळच्या सांगवी भागात विमानतळ पोलीस पथक गस्तीवर होते. या पथकात पोलीस निरीक्षक संजय नन्नावरे, उपनिरीक्षक शेख नजीर, अरविंद गायकवाड, गंगाधर कदम, भिसे, पोकॉ गंगावरे, डोपेवाड यांचा समावेश होता. या पथकाला खबऱ्याकडून माहिती मिळाली की, शंकरराव चव्हाण चौक ते आसना टी पॉइंटकडे जाणाऱ्या मार्गावर लाला पेट्रोलपंपाजवळ ट्रक क्रमांक एमएच १२ एचडी ७५११ थांबला आहे. या ट्रकमध्ये वजीर गुटख्याचा साठा आहे. या माहितीची खातरजमा करुन पोलीस निरीक्षक एस.एम.ननवरे व त्यांच्या सहकार्याने पंचासह तेथे छापा मारला. तेव्हा चालक पळून गेला होता. ट्रकची तपासणी केली असता ट्रकच्या मागच्या बाजूला भुसा भरलेली पोते आढळली आणि आतमध्ये तपासले असता त्यात जवळपास ४० हून अधिक पोती आढळून आली. ही पोती उघडून पाहिली असता त्यात वजीर नामक गुटखा आढळला. हा ट्रक व त्यातील गुटखा साठा पोलिसांनी विमातनळ ठाण्यात जमा केला. यानंतर अन्न व औषध प्रशासनाला पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या मार्फत माहिती देण्यात आली. बुधवारी सकाळी विमानतळ ठाण्यात या ट्रक मधील गुटखासाठ्याची तपासणी केल्यावर १० लाखांचा टाटा ट्रक व वजीर केसरयुक्त गुटख्याची ४० पोती असा एकूण ५९ लाख ७७ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

याबाबत सहाय्यक आयुक्त, अन्न व प्रशासन विभाग नांदेड यांना पत्र देण्यात आले. या विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. २००/१९ कलम १८८, २७२, २७३,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ट्रकचा चालक फरार झाल्याने हा गुटखा कुठून आणण्यात आला, कुठे नेण्यात येत होता, नांदेडमध्ये या गुटख्याच्या व्यवहाराशी संबंधित कोण आहे, याबाबत अधिक माहिती पोलिसांनाही मिळाली नाही. मात्र, सायंकाळी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी पोलीस ठाण्याला भेट दिल्यानंतर संबंधीत ट्रकचा मालक नामदेव हरिबा येलगुंडे (रा.केसनंद, शिरुर जि. पुणे) असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मान्टे करत आहेत.

Intro:नांदेड : पन्नास लाखांच्या गुटख्यासह ट्रक जप्त.
- विमानतळ पोलिसांची कारवाई.

नांदेड : शहराच्या बाहेरुन वसमत जाणारा लाखोंचा गुटखा व ट्रक विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतला असून अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या फिर्यादी वर विमानतळ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२७ ऑगस्ट रोजी रात्री शहरातील आसना पुलाजवळील सांगवी भागात विमानतळ पोलीस पथक गस्तीवर होते.या पथकात पोलीस निरीक्षक संजय नन्नावरे,उपनिरीक्षक शेख नजीर, पोहेकॉ अरविंद गायकवाड, पोना गंगाधर कदम, पोकॉ भिसे,पोकॉ गंगावरे, चालक पोकॉ डोपेवाड यांचा समावेश होता.Body:

या पथकाला खबऱ्या कडून माहिती मिळाली की, शंकरराव चव्हाण चौक ते आसना टी पॉइंट जाणाऱ्या मार्गावर लाला पेट्रोलपंपाजवळ ट्रक क्रमांक एमएच
१२ एचडी ७५११ थांबलेला आहे.या ट्रकमध्ये वजीर गुटख्याचा साठा आहे.या माहिती खातरजमा करुन पोलीस निरीक्षक एस.एम.ननवरे व त्यांच्या सहकार्याने
पंचासह तेथे छापा मारला.तेव्हा चालक पळून गेला होता तर ट्रकची तपासणी केली असता ट्रकच्या मागच्या बाजूला भुस्सा भरलेले पोते आढळले आणि आतमध्ये तपासले असता त्यात जवळपास ४० हून
अधिक पोते आढळले.हे पोते उघडून पाहिले असता त्यात वजीर नामक गुटखा आढळला. हा ट्रक व त्यातील गुटखा साठा पोलिसांनी विमातनळ ठाण्यात जमा केला आणि त्यानंतर पोलिसांनी अन्न व औषधी
प्रशासनाला पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या मार्फत माहिती दिली.बुधवारी सकाळी विमानतळ ठाण्यात या ट्रक मधील गुटखा साठ्याची तपासणी केल्यावर १० लाखांचा टाटा ट्रक व वजीर केसरयुक्त गुटख्याची ४० पोती असा एकूण ५९ लाख
७७ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.Conclusion:
याबाबत सहाय्यक आयुक्त, अन्न व प्रशासन विभाग नांदेड यांना पत्र दिल्यावरुन सदर विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. २००/१९ कलम १८८, २७२, २७३,३४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. या ट्रकचा चालक फरार झाल्याने हा गुटखा कुठून आणण्यात आला,कुठे नेण्यात येत होता, नांदेडमध्ये
या गुटख्याच्या व्यवहाराशी संबंधित कोण आहे याबाबत अधिक माहिती पोलिसांनाही मिळाली नाही. मात्र सायंकाळी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी पोलीस ठाण्यास भेट दिल्यानंतर संबंधीत ट्रकचा
मालक नामदेव हरिबा येलगुंडे रा.केसनंद, शिरुर जि. पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणाचा तपास पोनि ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मान्टे करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.