नांदेड- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांची मदत गरजेची आहे, असे आवाहन राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. कंधार तालुक्यात कोरोना नियंत्रणसंदर्भात विभागनिहाय आढावा बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कंधार तहसील कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा- ईटीव्ही भारत विशेष: लाॅकडाऊनमध्ये आदिवासी शिक्षितांपेक्षाही समजूतदार..
यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, नागरिकांनी लॉकडाऊन काळात देण्यात येत असलेल्या विविध सूचनांचे पालन करुन सर्वांनी एकजुटीने कोरोनाशी लढा दयावा. लॉकडाऊनच्या अनुषंगाने येणाऱ्या तक्रारी अडचणी विभागांनी समन्वय करुन सोडवाव्यात. शहरी व ग्रामीण भागात सोडीएम हॉपोक्लोराईड फवारणी करावी. भाजीपाला विक्रीसंदर्भात अवश्यक ती खबरदारी घ्यावी. कोरोना विषाणू नियंत्रणासाठी, पाणीटंचाई उपाय योजनेसाठी सर्व उपाययोजना कराव्यात. यासह विविध सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी विविध विभागांना दिल्या. यावेळी माजी जिल्हा परीषद सदस्य पुरुषोत्तम धोंडगे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता कोव्हीड निधीमध्ये 1 लाख 1 हजार 111 रुपयांचा धनादेश पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला.
कंधार तालुक्यात जंतू नाशक फवारणी अहवाल सादर करण्यात आला असून शहरात नगरपालीकेने दोन फवारणी टीसीएल पावडर वापरुन केले आहे. तसेच 116 ग्रामपंचायतीमध्ये देखील दोन फवारणी टीसीएल पावडर वापरुन केल आहे. ग्रामीण रुग्णालय कंधार येथे 20 बेड व ग्रामीण भागातील पानशेवडी, बारुळ, कुरुळा, पेढवडज, उस्माननगर प्राथमिक अरोग्य केंद्रात प्रत्येकी 5 बेड असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.
कंधार तालुक्यामध्ये शहरी भागात 27 व ग्रामीण भागात 36 खाजगी दवाखाने असून यासर्व दवाखाण्याची ओपीडी चालू ठेवण्यासंदर्भात डॉक्टर असोशियशनची बैठक घेऊन निर्देश देण्यात आले. सर्व खाजगी दवाखाने सुरू असल्याचे सांगितले. कंधार तालुक्यांमध्ये कोरोना संशयित व्यक्तींना कॉरानटाईन करण्यासाठी नगरपालिका इमारतीत 50 बेड व सदगुरू आश्रमशाळा येथे 50 व्यक्तींचे व्यवस्था होईल, असे पूर्व नियोजन करण्यात आले असल्याच देखील चव्हाण यांनी सांगितले.