ETV Bharat / state

अर्ध्यावरती डाव मोडला... संसार थाटण्यापूर्वीच वराचं निधन, आजच होतं लग्न - नांदेड मराठी बातमी

लग्न म्हटलं की आयुष्याची नवीन सुरवात... सर्व कुटुंब यामध्ये सहभागी होऊन मोठ्या आनंदात लग्नाची तयारी करतात. जवळील पाहूणे मंडळी मोठ्या उत्साहात वर-वधूला आशिर्वाद देण्यासाठी लग्नकार्यात येतात. मात्र नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात मनाला चटका लावणारी घटना घडली.

अर्ध्यावरती डाव मोडला, अधूरी एक कहाणी... संसार थाटण्यापूर्वीच वराचं निधन

author img

By

Published : Apr 7, 2021, 6:49 PM IST

Updated : Apr 7, 2021, 8:40 PM IST

नांदेड - लग्न म्हटलं की आयुष्याची नवीन सुरवात... सर्व कुटुंब यामध्ये सहभागी होऊन मोठ्या आनंदात लग्नाची तयारी करतात. जवळील पाहूणे मंडळी मोठ्या उत्साहात वर-वधूला आशिर्वाद देण्यासाठी लग्नकार्यात येतात. मात्र नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात मनाला चटका लावणारी घटना घडली. आज (7 एप्रिल) उत्तम शिराणे (वय 26) हे लग्नाच्या बेडीत अडकणार होते. मात्र संसार थाटण्यापूर्वीच वराचं निधन झाल्याची बातमी घरी आली. त्यामुळे क्षणातच आनंदाचे क्षण दुख:त पलटले. कारण घोड्यावरून वरात काढून लग्नाचा आनंद साजरा करण्याऐवजी तिरडीवरून नवरदेवाचा मृतदेह नेण्याचा प्रसंग शिराणे कुटुंबावर आला. दोन्ही कुटुंबात लग्नाची जय्यत तयारी जवळपास पूर्ण झाली होती. हा आंनदाचा क्षण येण्याअगोदरच वधू-वराच्या दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उत्तमच्या आठवणीने 'ईटीव्ही भारत' शी बोलताना कुटुंबाला गहिवरून आले होते.

भावी आयुष्याचे स्वप्न पाहणाऱ्या नववधूचा आयुष्यात देखील दुख:चा डोंगर-

येत्या 7 एप्रिल रोजी सकाळी बोहल्यावर बसणार असलेले उत्तम भुजंगराव शिराणे २ एप्रिल रोजी सकाळी लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटप करण्यासाठी मोटारसायकलने जात होते. दरम्यान, नांदेडकडे येत असताना त्यांना बारड-भोकर फाटा रोडवर निर्मल काॅटन इंडस्ट्रीज समोर अचानक अज्ञात वाहनानी जोराची धडक दिली. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. मयत उत्तम शिराणे यांचा बळीरामपूर तालुक्यातील वैष्णवी यांच्याशी विवाह होणार होता. परंतु विवाह बंधनात अडकण्यापूर्वीच लग्न समारंभाचे निमंत्रण पत्रिका वाटप करण्यासाठी निघालेल्या नवरदेवावर काळाने झडप घातली. यामध्ये भावी आयुष्याचे स्वप्न पाहणाऱ्या नववधूचा आयुष्यात देखील दुख:चा डोंगर कोसळला.

अर्ध्यावरती डाव मोडला, अधूरी एक कहाणी... संसार थाटण्यापूर्वीच वराचं निधन

शिराणे कुटुंबाची परिस्थिती हालाखीची...!

गरीब कुंटुंबातील लग्न म्हटले की आनंदाला पैशांचे स्वरूप प्राप्त होते. मात्र या आनंदावर काळाने झडप घातली, आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. टाकराळा येथील भुजंगराव शिराणे यांची परिस्थिती प्रचंड हलाखीची आहे. त्यांना दोन मुले व तीन मुली आहेत. तिन्ही मुलीचे लग्न झाले आहेत. दोन मुले मजुरी करून आपल्या वडीलांच्या खांद्यावरील भार आपल्या खांद्यावर घेत होते. उत्तम हा छोटा मुलगा नांदेड येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता.

उत्तमची आठवण काढून व्यक्त करत आहेत दुःख...!

आयुष्यातील महत्वाचा व आनंदाचा क्षण म्हणजे लग्न. उत्तम उत्साहात स्वत: पत्रिका वाटत होता. वडील आणि भाऊ ही पत्रिका वाटत लग्नाची तयारी साजरी करत होते. पण अचानक उत्तमचा अपघात झाला. १ एप्रिलला रात्री उशिरा ही घटना घडली. दुसऱ्या दिवशी सकाळी पत्रिकेवरील क्रमांक पाहून मोठा भाऊ दिगंबरला अपघाताबदल कळाले. त्यानंतर संपूर्ण गावावरच शोककळा पसरली. वधूकडील मंडळीने परीस्थीती हालाकीची असतांना मोठी तयारी केली होती. मात्र त्यावर देखील विरजन पडले. दरम्यान, वधू आणि वराकडील मंडळी अजूनही लग्न आणि उत्तमची आठवण काढून दुःख व्यक्त करत आहेत.

हेही वाचा- अनेक अपयशानंतर मिळाले यश, "मोसमी"चे खाकीचे स्वप्न पूर्ण

Last Updated : Apr 7, 2021, 8:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.