नांदेड- शहराजवळ निर्जन शिवारात आज एक भला मोठा अजगर सापडला आहे. सोयाबीन असलेल्या एका शेतात 8 ते 10 फुटाचा हा अजगर शेतकऱ्यांला आढळून आला. त्यानंतर सर्पमित्राला बोलावून या अजगराला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.
सर्पमित्र गणेश भोसले आणि रघुवीर बकाल यांनी या अजगराला या शेतातून पकडले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्याच्या सहकार्याने या अजगराला सुरक्षितपणे जंगलात नेऊन सोडले आहे. शहराजवळ आणि नागरी वस्तीच्या जवळच हा अजगर आढळल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती.
गोदावरी नदी शेजारी अजगर आढळून येतच असतात. नागरिकांनी अजगर दिसताच सर्पमित्राला बोलवावे असे आवाहन वनविभागाने केले आहे. हा अजगर महाकाय अशा स्वरूपाचा होता. सात ते आठ फूट लांबी असलेल्या या अजगराचे वजनही जास्त होते. त्यामुळे, सर्पमित्रांनी विशेष काळजी घेत त्याला सुरक्षित स्थळी हलवले आहे.