नांदेड - शहरात पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शेख अब्दुल या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला रस्त्यावर एक पर्स सापडली. त्यात मोठा ऐवज असतानाही त्यांनी ती परत केल्यामुळे त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
हेही वाचा - सोन्याची खोटी नाणी देऊन महिलेला ६० हजारांना गंडवले
शहरातील ज्योती लोखंडे नावाच्या या महिलेच्या पर्समध्ये रोख रक्कम चौदा हजार रुपये, सोन्याची एक चैन आणि काही कागदपत्रे होती. शेख अब्दुल यांनी ही पर्स सुरक्षितपणे पोलीस खात्यात जमा केली. त्यानंतर पर्सच्या मालकिणीची ओळख पटवत तिला ती पर्स परत देण्यात आली. शेख अब्दुल यांच्या या प्रामाणिकपणाच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.