ETV Bharat / state

Girl Student Suicide : चौथीत शिकणाऱ्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; घातपात की आत्महत्या?

author img

By

Published : Dec 13, 2022, 6:55 PM IST

अवघ्या चौथीत शिकणाऱ्या मुलीने हॉस्टेलमध्ये गळफास (girl students hanging ) लावत संशयास्पद आत्महत्या (girl students suicide) केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. हदगांव तालुक्यातील केदारगुडा इथल्या शासकीय आश्रम शाळेच्या वसतिगृहात हा प्रकार घडला.

Girl Students Suicide
मृत विद्यार्थिनी
विद्यार्थिनीच्या आत्महत्येवर प्रतिक्रिया देताना

नांदेड : चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या माझ्या लेकीने आत्महत्या केल्याचा (girl students suicide) दावा केला जात आहे. तिने वसतिगृहाच्या खोलीचा दरवाजा आतून लावला, पलंगाला गळफास (girl students hanging ) घेतल्याचे म्हटले जात आहे. पण इवल्याशा लेकीचा साडे ६ फूट दरवाजाच्या कडीला हातही पुरत नाही तर ती आतून कडी लावून आत्महत्या कशी करेल, असा प्रश्न मुलीच्या पित्याने केला आहे. या घटनेने नांदेडमध्ये एकच खळबळ माजली आहे.

प्रकरण दाबण्याचा प्रयत्न : वसतिगृहाचे संचालक आणि पोलीस मिळून हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुलीचे नातेवाईक करत आहेत. माझ्या लेकीसोबत नेमके काय झाले हे लपवू नका, खरं काय ते सांगा, अशी कळकळीची विनंती तिचे नातेवाईक करत आहेत. नांदेडमध्ये अवघ्या चौथीत शिकणाऱ्या मुलीने हॉस्टेलमध्ये गळफास लावत संशयास्पद आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. हदगांव तालुक्यातील केदारगुडा इथल्या शासकीय आश्रम शाळेच्या वसतिगृहात हा प्रकार घडला. विश्रांती देशमुखे असे मयत मुलीचे नाव असून तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

सरपंच काय म्हणाले? - गावातील लोक गेले तेव्हा मुलीला जमिनीवर चादरीवर टाकलेले होते. त्या मुलीने पलंगावरून गळफास घेतल्याचे आम्हाला त्यावरून वाटत नाही. तो दरवाजा साडेसहा फूटाचा आहे. साडेतीन फुटांची मुलगी दरवाजाची कडी आतून लावू शकत नाही. एक महिन्यापूर्वी एका मुलीने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना याच वसतिगृहात घडली होती. याची चौकशी व्हायला पाहिजे, प्रशासनाने कडक कारवाई करायला पाहिजे, अशी मागणी गावातील सरपंचांनी केली आहे.

घातपाताचा संशय व्यक्त : चिमुकली आपल्या दोन बहिणी बरोबर विश्रांती या वसतिगृहात राहत होती. काल सायंकाळी शाळा लवकर सुटल्याने ती एकटी खोलीत आली आणि तिने पलंगाला फास लावत आत्महत्या केल्याचे सांगितले. मात्र खोलीतील पलंग आणि इतर बाबी पाहता घातपाताचा संशय व्यक्त होतोय. मनाठा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोस्टमार्टेम अहवालानंतर यामागे नेमके काय कारण आहे, हे समजेल. दरम्यान, मुलीने आत्महत्या केल्याचे वसतिगृह प्रशासनाने कुटुंबाला कळवले होते. त्यानंतर सोमवारी रात्री शाळेत नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. आश्रम शाळेच्या व्यवस्थापनाबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे.

इन कॅमेरा पोस्ट मार्टम : नांदेडच्या सरकारी रुग्णालयात मुलींचे इन कॅमेरा पोस्ट मार्टम करण्यात येत आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना मुलीच्या वडिलांनी आत्महत्येच्या घटनेवर संशय व्यक्त करत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर अतिरिक्त महिला पोलीस अधीक्षक यांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.