ETV Bharat / state

Gender Reassignment : नांदेडचे सुप्रसिद्ध कलावंत डॉ.भरत जेठवानी झाले सान्वी जेठवानी - live marathi Batmya

नांदेडमधील सांस्कृतिक ओळख असणारे दिग्गज कलावंत डॉ. भरत जेठवाणी यांनी स्वतःचे लिंग परिवर्तन केले आहे. पुरुषहुन स्त्रीरूप धारण केल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. डॉ. भरत जेठवाणी हे आता सान्वी जेठवानी या नावाने ओळखले जाणार आहेत. त्यांनी लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रीया ( Sex Reassignment Surgery ) दिल्लीतील एका खासगी रुग्णालयातून करुन घेतली आहे.

डॉ.भरत जेठवानी
डॉ.भरत जेठवानी
author img

By

Published : Apr 25, 2022, 7:03 PM IST

Updated : Apr 25, 2022, 7:23 PM IST

नांदेड - नांदेडमधील सांस्कृतिक ओळख असणारे दिग्गज कलावंत डॉ. भरत जेठवाणी यांनी स्वतःचे लिंग परिवर्तन केले ( Gender Reassignment ) आहे. पुरुषहुन स्त्रीरूप धारण केल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. डॉ. भरत जेठवाणी हे आता सान्वी जेठवानी या नावाने ओळखले जाणार आहेत. त्यांनी लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रीया ( Sex Reassignment Surgery ) दिल्लीतील एका खासगी रुग्णालयातून करुन घेतली आहे.

भरत झाले सान्वी
भरत झाले सान्वी

दिल्ली येथील खासगी रुग्णालयातून करुन घेतली शस्त्रक्रिया - मानव रोग तज्ज्ञापासून ते प्लास्टिक सर्जरी करेपर्यंत याची एक मोठी प्रक्रिया असून यासाठी अनेक चाचण्या कराव्या लागतात. हक्काचे संरक्षण 2019 या कायदे अनुसार विविध हक्क अशा व्यक्तींना मिळत आहे. जेठवाणी यांनी ही शस्त्रक्रिया दिल्लीतील एका खासगी रुग्णालयातून करून घेतले. माणसाची ओळख ही चारित्र्याने व आत्म्याने होत असते. त्यामुळे लिंग स्त्री असो किंवा पुरुष असो माणसाची ओळख माणुसकीने झाली पाहिजे, असे प्रतिपादन पत्रकारांशी बोलताना जेठवाणी यांनी केले.

भरत झाले सान्वी
भरत झाले सान्वी

नांदेडला सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक मिळवून दिले - लहानपणापासून मनात असलेल्या एका स्त्रीला आता समाजातही स्थान मिळेल समाजाने व मित्रमंडळीने सर्वांनी मला प्रोत्साहन दिल्याचे डॉ. जेठवाणी यांनी सांगितले. जेठवाणी यांनी उच्च शिक्षण प्राप्त केले असून नांदेडला सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक मिळवून दिले आहे आणि हे कार्य सतत आयुष्यभर सुरू राहणार, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. रक्तदान शिबिर आयोजित करणे, राष्ट्रीय एकता रॅली आयोजित करणे, सांस्कृतिक समारंभ भरवणे, झाडे लावणे व अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवत स्वतःची ओळख एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही केली आहे. पुढेही सामाजिक कार्य थांबणार नाही व आणखी अनेक मुद्दे घेऊन समाजकार्य करण्याचे ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले.

भरत झाले सान्वी
भरत झाले सान्वी

समाजाचा लिंगाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा - समाजाचा दृष्टिकोन इतर लिंगाकडे बघण्याचा वेगळा असतो तो त्यांना आपल्यातला समजत नाही तर हा भेदभाव फरक मिटवून टाकायचा आहे व माणसाची ओळख माणूस म्हणून राहिली पाहिजे. यासाठीही ते कार्य करणार आहेत, अशी माहिती दिली. अनेक लोकांना आता याबाबत उत्सुकता झाली असून अनेक संशोधनकार या विषयावर त्यांच्यासोबत मिळून संशोधन करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

भरत झाले सान्वी
भरत झाले सान्वी

हेही वाचा - Hottal Temples In Nanded : प्राचीन अशा शिल्पकला, वास्तुकलेचा उत्कृष्ठ नमुना.. नांदेडमधील होट्टल मंदिरे

Last Updated : Apr 25, 2022, 7:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.