ETV Bharat / state

मनोरूग्णाचा वाढदिवस साजरा करत मित्रांनी दिला आपुलकीचा संदेश

author img

By

Published : Nov 24, 2020, 10:49 PM IST

नेता, अभिनेता, आमदार, खासदार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अर्धापूर येथील एका मनोरूग्णाचा वाढदिवस त्यांच्या मित्रांनी धुमधडाक्यात साजरा करून एक आपुलकी जपत मैत्रित सर्व समान असते हा संदेश दिला आहे.

friends-gave-a-message-of-affection-while-celebrating-the-psychiatrists-birthday-in-nanded
मनोरूग्णाचा वाढदिवस साजरा करत मित्रांनी दिला आपुलकीचा संदेश

नांदेड - वाढदिवस प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा दिवस असतो. हा दिवस धुमधडाक्यात व्हावे, ही सर्वांची इच्छा असते. नेता, अभिनेता, आमदार, खासदार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. हितचिंतकांची गर्दी, शुभेच्छांचा वर्षाव, बॅनरबाजी, समाजमाध्यम, वर्तमान पत्रातून जाहिरात हे आपण नेहमीच अनुभवतो. सोशल मीडिया आल्यानंतर वाढदिवसानिमित्त होणारे कार्यक्रम वाढले आहेत. मात्र, अर्धापूर येथील एका मनोरूग्णाचा वाढदिवस त्यांच्या मित्रांनी धुमधडाक्यात साजरा करून एक आपुलकी जपत मैत्रित सर्व समान असते हा संदेश दिला आहे. आरएफ असे या मनोरुग्णाचे नाव आहे.

त्रास न देणारा सर्वपरिचित मनोरुग्ण-

अर्धापूर शहरातील नवी अबादी भागात आरएफ नावाचा एक तरुण मनोरूग्ण आहे. शहरातील विविध भागात, समारंभात फिरत असतो. तसेच आजूबाजूच्या गावातदेखील तो जातो. कोणत्याही मिरवणुकीत नाचून मनोरंजन करणे, हा त्याचा आवडता छंद आहे. तो जरी मनोरूग्ण असला तरी कोणालाही त्रास देत नाही. खाण्यासाठी मदत मागतो. तो सर्वांना परिचित आहे.

आरएफच्या मित्राची प्रतिक्रिया
मनोरुग्णाच्या नशिबात सहसा वाढदिवस नसतोच-

नेते, अभिनेते, आमदार, खासदार मंत्री अधिकारी, पदाधिकारी तसेच गावापासून ते दिल्लीपर्यंत वाढदिवस साजरे केले जातात. तसेच हे वाढदिवस चर्चेचा विषय ठरतात. पण एखाद्या मनोरूग्णाच्या नशीबात असे आनंदाचे प्रसंग क्वचितच येतात. यांना कोणी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत नाहीत. वाढदिवस साजरा करणे हे फारच दूरचे आहे.

जिवलग मित्रांनी दिल्या विविध माध्यमातून शुभेच्छा-

आरएफचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय त्यांच्या जीवलग मित्रांनी घेतला. सगळ्या मित्रांनी तयारी सुरू केली. कोणी बॅनर्स तयार केले, तर कोणी शुभेच्छा देणारे व्हिडिओ तयार केले. तसेच केक आणि नवीन कपडे आणण्यात आले. जेवणाची मेजवानी देण्यात आली. हा आगळा वेगळा वाढदिवस जिल्ह्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.