नांदेड - नांदेड विभागातील सर्व रेल्वे स्थानकांवर नि:शुल्क वाय-फाय सुविधा पुरवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. नांदेडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा यांनी ही माहिती दिली.
नांदेड विभागातील सर्व ७१ रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा उपलब्ध झाली आहे. रविवारी पूर्णा रेल्वे स्थानकावर ही सुविधा सुरु करुन ही योजनी पु्र्ण करण्यात आली.
हेही वाचा - पुन्हा नकोशी.! शिरूरमध्ये नवजात अर्भकला जन्मदात्यांनीच सोडले बेवारस
नांदेड विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहाय्याने अगदी कमी कालावधीत ही योजना पुर्ण झाली. याबद्दल रेल्वे व्यवस्थापक राभा यांनी दूरसंचार विभागाचे अभिनंदन केले. नांदेड रेल्वे विभातील रेल्वे प्रवाश्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केले.