ETV Bharat / state

नांदेडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून 24 लाखांना गंडविले, आरोपी जेरबंद

author img

By

Published : Sep 15, 2019, 11:56 AM IST

जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील धामणगाव येथील आरोपी माधव झंपलवाड हा किनवट शहरानजीकच्या गोकुंदा भागात आपल्या नातेवाईकाकडे २०११-१२ मध्ये राहावयास आला होता. त्याने येथे घरही विकत घेतले होते. तसेच घर, दुकानाची रंगरंगोटी करुन उदरनिर्वाह तो करीत होता. या ओळखीतून त्याने आपली मुखेड तालुक्यातील धामणगाव येथे रुक्मिणीबाई शिक्षण संस्था आहे. या संस्थेत कर्मचारी भरावयाचे आहेत, असे लोकांना सांगून विश्वासात घेतले आणि सहा जणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 24 लाख 50 हजार रुपये उकळले.

किनवट पोलीस ठाणे

नांदेड - जिल्ह्यातील किनवट येथे नोकरीचे आमिष दाखवून 24 लाख 50 हजारांचा गंडा घालणाऱ्या रॅकेटमधील मुख्य सुत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे. माधव सटवाजी झंपलवाड (58) असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने आरोपीस सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा - 'वंचित'मुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत फायदा - शरद पवार

जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील धामणगाव येथील आरोपी माधव झंपलवाड हा किनवट शहरानजीकच्या गोकुंदा भागात आपल्या नातेवाईकाकडे 2011-12 मध्ये राहावयास आला होता. त्याने येथे घरही विकत घेतले होते. तसेच घर, दुकानाची रंगरंगोटी करुन उदरनिर्वाह तो करीत होता. या ओळखीतून त्याने आपली मुखेड तालुक्यातील धामणगाव येथे रुक्मिणीबाई शिक्षण संस्था आहे. या संस्थेत कर्मचारी भरावयाचे आहेत, असे लोकांना सांगून विश्वासात घेतले आणि सहा जणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 24 लाख 50 हजार रुपये उकळले.

हेही वाचा - बीडमध्ये पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची २५ किलोमीटरची पायपीट

राहुल भीमराव राऊत (रा.दत्तनगर गोकुंदा), सोमेश्वर सोमवारे, दयानंद गवळी, लक्ष्मण तलांडे, स्मीता बोरकर, मंजुषा कोंडापे यांच्याकडून एकूण 24 लाख 50 हजार रुपये नोकरीचे आमिष दाखवून व खोटे नियुक्तीपत्र देऊन झंपलवाडने उकळले. फसविल्या गेलेल्या सहा जणांनी झंपलवाडचा शोध घेतला असता, त्यांनी गोकुंद्यातील घरही विकून पोबारा केल्याचे समजले. उपरोक्त तक्रार आणि फसवणूक झालेल्यांनी त्याचा शोध घेतला असता, तो मुखेड तालुक्यातील धामणगावमध्ये सापडला. मात्र, त्याने सर्वांना धमक्या देऊन हाकलून दिले.

हेही वाचा - पक्षाने आदेश दिल्यास स्वतंत्र लढू, भाजप आमदार दरेकर यांचा निर्धार

यानंतर या तरुण-तरुणींनी किनवट पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. यानुसार किनवट पोलिसांनी माधव झंपलवाड याच्याविरुध्द गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला होता. मात्र, तो गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. उपनिरीक्षक गणेश पवार हे गणपती मिरवणूक बंदोबस्तावर गोकुंदा भागात असताना त्यांना आरोपी झंपलवाड हा सिडको भागात असल्याची माहिती खबऱ्याने दिली. पोलीस उपनिरीक्षक पवार आणि त्यांचे काही कर्मचारी नांदेड गाठले आणि आरोपीला त्याच्या घरातून अटक करून न्यायालयात हजर केले असता, किनवट न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Intro:नांदेड : नोकरीचे आमिष दाखवून 24 लाखांना गंडविले !
- आरोपी जेरबंद.

नांदेड : किनवट नोकरीचे आमिष दाखवून चोवीस लाख पन्नास हजारांचा गंडा घालणाऱ्या रॅकेटचे मुख्य
सुत्रधाराला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत
ठेवण्याचे आदेश दिले आहेत.Body:
किनवट पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, नांदेड
जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील धामणगाव येथील आरोपी माधव सटवाजी झंपलवाड- ५८ हा किनवट शहरानजीकच्या गोकुंदा भागात आपल्या नातेवाईकाकडे २०११-१२ मध्ये राहावयास आला
होता.त्याने गोकुंद्यात घरही विकत घेतले होते.तसेच घर, दुकानाची रंगरंगोटी करुन उदरनिर्वाह तो
करीत होता. या ओळखीतून त्याने आपली मुखेड तालुक्यातील धामणगाव येथे रुक्मिणीबाई
शिक्षण संस्था आहे.या संस्थेत कर्मचारी भरावयाचे आहेत,असे लोकांना सांगून विश्वासात घेतले आणि सहा जणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून २४ लाख ५० हजार रुपये उकळले.
राहुल भीमराव राऊत रा.दत्तनगर गोकुंदा, सोमेश्वर सोमवारे, दयानंद गवळी, लक्ष्मण तलांडे, स्मीता बोरकर, मंजुषा कोंडापे यांच्याकडून एकूण २४ लाख
५० हजार रुपये नोकरीचे आमिष दाखवून व खोटे नियुक्तीपत्र देऊन झंपलवाडने उकळले.फसविल्या गेलेल्या सहा जणांनी झंपलवाडचा शोध घेतला
असता त्यांनी गोकुंद्यातील घरही विकून पोबारा केल्याचे समजले. उपरोक्त फिर्यादी व फसवणूक
झालेल्यांनी त्याचा शोध घेतला असता तो मुखेड तालुक्यातील धामणगावमध्ये सापडला. परंतु त्याने सर्वांना धमक्या देऊन हाकलून दिले. त्यानंतर फसवणूक झालेल्या तरुण-तरुणींनी किनवट
पोलिसात धाव घेऊन तक्रारी दिल्या.Conclusion:त्यानुसार किनवट पोलिसांनी माधव झंपलवाड याच्याविरुध्द गुरनं ९२/ २०१८ कलम ४२०, ५०६(२) प्रमाणे गुन्हा नोंद करून त्याचा शोध सुरु केला होता. परंतु तो गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.
उपनिरीक्षक गणेश पवार हे गणपती मिरवणूक बंदोबस्तावर गोकुंदा भागात असताना त्यांना आरोपी झंपलवाड हा सिडको भागात असल्याची माहिती खबऱ्याने दिली. पोलीस उपनिरीक्षक पवार आणि त्यांचे काही कर्मचारी नांदेड गाठले आणि आरोपीला त्याच्या घरातून अटक करून न्यायालयात हजर केले असता किनवट न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.