ETV Bharat / state

Nanded Robbery News : हदगाव शहरात दरोडा; लाखोंचा ऐवज लंपास

हदगांव शहरातील मारोती नगर भागातील यादव अप्पा गंदेवार यांच्या घरात रात्री चार दरोडेखोरांनी दरोडा ( Robbery ) टाकला. यात दरोडेखोरांनी लाखोंचा ऐवज लंपास ( Robbers looted lakhs of rupees ) केला आहे.

Robbery in Hadgaon city, loss of lakhsRobbery in Hadgaon city, loss of lakhs
हदगाव शहरात दरोडा लाखोंचा अवेज लंपास
author img

By

Published : Jul 17, 2022, 9:23 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील हदगांव शहरात बड्या व्यापाऱ्याच्या घरी दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा ( Robbery ) टाकत लाखोंचा ऐवज लंपास ( Robbers looted lakhs of rupees ) केला आहे. हदगांव शहरातील मारोती नगर भागातील यादव अप्पा गंदेवार यांच्या घरात रात्री चार दरोडेखोरांनी घुसून हा दरोडा टाकला. या दरोडेखोरांनी गंदेवार यांच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण करत जीवे मारण्याच्या धमक्या देत घरातील मौल्यवान वस्तू पसार केल्या आहेत.

हेही वाचा - Vice President Election 2022: उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेनेचा यूपीएला पाठिंबा

या दरम्यान दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत गंदेवार कुटुंबातील तिघे जण जखमी झाले आहेत. या दरोड्यात तब्बल सत्तर तोळे सोने, दीड लाख नगदी असा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला आहे. बाईकवर आलेल्या दरोडेखोरांनी काही शस्त्र, चार बाईक घटनास्थळीच सोडून पळ काढला. तसेच तिथल्याच दोन मोटारसायकल देखील दरोडेखोरांनी पळवल्या आहेत. नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेची टीम हदगांव शहरात दाखल झाली असून दरोड्याचा तपास सध्या सुरू आहे.

हेही वाचा - MLAs Suspension Petition Hearing : आमदार निलंबनाच्या याचिकेवर 20 जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.