नांदेड : आगामी लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर परभणी लोकसभा मतदार संघातून ( Parbhani Lok Sabha constituency ) लढण्यास इच्छूक आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर ( Former Minister Mahadev Jankar ) नांदेड येथे आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नांदेड येथे त्यांनी पक्षाचा मेळावा देखील घेतला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका ( Role of Rashtriya Samaj Party ) स्पष्ट केली.
रासप देशातील १७ राज्यात कार्यरत आहे. सध्या रासपला चार राज्यात तांत्रिक मान्यता देखील मिळाली आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यात ही मान्यता मिळाली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचा विस्तार देशभरात होईल या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. पुढील काळात रासपला राष्ट्रीय मान्यता मिळेल, देशभरात आम्ही निवडणुका लढवू आणि जिंकू देखील असं जानकर म्हणाले.
परभणी मतदार संघातून लोकसभा लढणार -
आगामी लोकसभा निवडणुकीत रासप सर्व जागा स्वबळावर लढवणार आहे. तर परभणी लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल करणार असल्याचे महादेव जानकर ( Former Minister Mahadev Jankar ) यांनी सांगितलं. परभणी मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा तसा आग्रह असल्याचे देखील ते म्हणाले. निवडणूक लढवू आणि विजय देखील मिळवू असा विश्वास जाणकार यांनी व्यक्त केला आहे.