नांदेड: हल्ली प्रत्येक क्षण कॅमेरात कैद होतोय, अगदी केसांवरून हाथ फिरवला, तरी तेच फोटो दाखवत अशोक चव्हाणांच्या अडचणी वाढल्या अश्या बातम्या येतात. अश्या शब्दांत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण Former Chief Minister Ashok Chavan यांनी माध्यमांना चिमटा काढला आहे. नांदेडमधल्या एका रस्त्याला आज सांयकाळी जुन्या पिढीतील फोटोग्राफर बाबूभाई ठक्कर यांचे नाव देण्यात आले आहे.
या कार्यक्रमात चव्हाण यांनी अत्याधुनिक कॅमेरा बाबत सांगत थेट माध्यमांनाच चिमटा काढत मिश्किल वक्तव्य केले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोटोग्राफीचा छंद आहे. आणि त्यांना पाहून मलाही फोटोग्राफी करावीशी वाटते, असे वक्तव्य काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलं आहे. नांदेडमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी फोटोग्राफी शिकण्याची आवड बोलून दाखवले आहे.